गोंदिया,दि.26ः- गोंदिया जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग सातत्याने वाढत असून जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात कोरोनाचा शिरकाव झाल्याने खबरदारीचे उपाययोजना करण्यासाठी व इमारतीच्या निर्जतुंकीकरणासाठी सोमवारपर्यंत(31 आॅगस्ट)प्रशासकीय इमारतीमधील सर्व कार्यालये अत्यावश्यक सेवा वगळता बंद करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खेवले यांनी(दि.25) दिले होते.त्यात आज बुधवारला(दि.26)पुन्हा सुधारणा करीत उद्यापासून(दि.27) कार्यालय नियमित सुरु करण्याचे आदेश निघाले असून फक्त 25 व 26 या दोन दिवसाकरीताच जिल्हा परिषद बंद ठेवण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आले आहे.त्यातच आज गोरेगाव पंचायत समितीमधील एक स्थापत्य अभियंता व त्याचा सहकारी पाॅझिटिव्ह आढळून आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.विशेष म्हणजे सोमवारला झालेल्या एका बैठकीत सदर स्थापत्य अभियंता सुध्दा हजर असल्याची माहिती समोर आली आहे.पंचायत समितीतील कर्मचारी पाॅझिटिव्ह आढळून आल्याने पंचायत समितीचे निर्जतुंकीकरणासाठी सर्व कार्यालय 30 आॅगस्टपंर्यत बंद ठेवण्याचे आदेश गटविकास अधिकारी झेड.जी.टेंभरे यांनी दिले आहेत.सोबतच अत्यावश्यक सेवेचे कार्यालय सुरु राहणार असून वेळप्रसंगी आवश्यक असल्यास कर्मचारी यांना बोलावले जाईल असे म्हटले आहे.त्यातच जिल्ह्यात आज 59 रुग्ण आढळून आले असून गोंदियातील 50 रुग्णांचा समावेश आहे.गोरेगाव पंचायत समितीचे सॅनियाटझर करण्यासाठी विस्तार अधिकारी सी.सी.हरिणखेडे,आरोग्य पर्यवेक्षक एम.बी.नंदागवळी व परिचर सी.डी.डोहळे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
गोरेगाव पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव,पंस रविवावरपर्यंत बंद
जिल्ह्यात आज 59 रुग्ण,गोंदिया शहरातील 50 रुग्णांचा समावेश