Home मराठवाडा सावरगावातच भगवानबाबांच्या नावाने संस्कार केंद्र -ना.पकंजा मुंडे

सावरगावातच भगवानबाबांच्या नावाने संस्कार केंद्र -ना.पकंजा मुंडे

0

बीड,दि.30 : मंत्रिपदाची शपथ घेतली, त्यापेक्षा आज जास्त समाधानी आहे, असे पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात म्हटले. सावरगावातील सभेचा प्रतिसाद बघून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे भारावल्या. तर तिकडे महंत नामदवेशास्त्रींच्या विरोधानंतर भगवानगडाची गर्दी ओसरल्याचं चित्र पाहायला मिळाले.भगवानगडावर मला जायला विरोध केला जातो. मी काय आतंकवादी आहे का?, असा सवाल पंकजा मुंडे यांनी केला.महंत नामदेवशास्त्रींनी भगवानगडावर दसरा मेळाव्याला पंकजा मुंडे यांना विरोध केल्यानंतर, पंकजा मुंडेंनी यंदाचा दसरा मेळावा भगवानगडाच्या जन्मगावी म्हणजे बीडमधील सावरगावात घेण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यात पंकजा मुंडे यांनी समजाबांधवांना भावनिक साद देत, त्यांना सर्वांगीण विकासाचे आश्वासनही दिले.या मेळाव्याला महादेव जानकर, राम शिंदे,खा.प्रितम मुंडे यांच्यासह पंकजा मुंडेंचे अनेक समर्थकही हजर होते.

एरवी दसऱ्याला भक्तांनी फुलुन जाणाऱ्या भगवानगडावर नेहमीसारखी गर्दी पाहायला मिळाली नाही. यंदा ते चित्र उलट पाहायला मिळालं. यंदा भगवानगडावर शुकशुकाट पाहायला मिळाला, तर सावरगावात पंकजा मुंडे यांच्या सभेला प्रचंड जनसागर लोटला.सावरगावातच भगवानबाबांच्या नावाने संस्कार केंद्र व भव्य अशी मूर्ती उभी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली.

Exit mobile version