Home विदर्भ गडचिरोलीत निघाला ट्रक्टर/ ट्रक चालकांचा भव्य मोर्चा

गडचिरोलीत निघाला ट्रक्टर/ ट्रक चालकांचा भव्य मोर्चा

0

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.०३-ट्रक्टर चालक मालक संघटना गडचिरोली जिल्हाच्यावतीने आज शनिवारला तहसिलकार्यालयासमोरून सुरु झालेला ट्रक्टर/ ट्रक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोच्र्याचे नेतृत्व विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय वड्डेटीवार,माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी,राम मेश्राम यांच्या नेतृत्वात काढण्यात आला.या मोच्र्यामध्ये जिल्ह्यातील ५०० ते ६०० च्यावर ट्रक/ ट्रक्टर चालक,मालक व यावर अवलंबून असलेले कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.वड्डेटीवार यांनी सरकारच्या धोरणावर कडाडून टिका करीत सर्वसामान्य जनतेचा रोजगार भाजपसेना सरकार हिरावून घेत असल्याचा आरोप केला.जाहिरसभेनंतर जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्याना पाठविलेल्या निवेदनात गौण खनिजावरील शासनाने लावलेल्या जाचक अट्टी रद्द करण्यात यावे.१२ जानेवारी १८ चा गौण खनिज संबधीचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा.प्रत्येक रेतीघाटावर शासनाने आपला अधिकारी नेमावा.टि.पी.धारकांना शासनाने लादलेला दंड बंद करण्यात यावा.रेतीघाटावर जिपीएस यंत्रणा व सिसीटीव्ही शासनाने स्वखर्चाने लावून द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. या मोच्र्यात एजाज शेख,संतोष लांजेवार,दिनेश आकरे,प्रफुल चापले,रणजित ओलालवार,संजय वड्डेटीवार,मुस्ताफ कुरेशी,जयंत हरडे,संदिप दहिकर,जितूभाऊ मोटवानी,मुकेशी श्रीरामे,यशवंत भुरले,मोहन भुरले,संजय मानकर,दिलीप भोयर आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version