
वर्धा,दि.09ःइमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळांतर्गत कामगारांच्या मुलांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम काढून देण्याकरीता ३० हजारांची लाच मागितल्याप्रकरणी वर्धा जिल्हा कामगार कार्यालयाचा वर्ग २ जिल्हा
कामगार अधिकारी पवनकुमार चव्हाण (वय ३३) याला त्याच्या वाहनचालकासह लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर येथील पथकाने ताब्यात घेतले.
कामगार अधिकाNयाने ही रक्कम त्याच्या गाडीचा चालक पवन अंबादे याच्या मार्पâत स्वीकारण्याचे नियोजन केले होते.
कामगार अधिकारी चव्हाण याच्या सांगण्यावरूनच मी ही रक्कम घेतल्याचे वाहनचालक पवन अंबादे याने पोलिसांना सांगितले.पवन अंबादे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कामगार मंडळाकडून मजुरांच्या मुलांकरीता देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम काढून देण्याकरीता ३० हजार रुपयांची लाच मागणी केली होती.यात आली होती.
या प्रकरणी तक्रारदाराने थेट लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर कार्यालयाशी संपर्क साधला. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला मिळालेल्या माहितीची शहानिशा करीत दि.८ रोजी सायंकाळच्या वेळेस सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलिस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अप्पर पोलिस अधीक्षक दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात नागपूरच्या लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे दिनेश लबडे, श्रीकांत गोतमारे,अशोक बैस, योगेंद्र चौधरी, राजेश
बन्सोड, नरेंद्र चौधरी, शालिनी जांभूळकर यांनी केली. या प्रकरणी रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





