
वाशिम, दि. ०9 : ‘विकेल ते पिकेल’ अभियान तसेच जागतिक बँक अर्थसहाय्यीत ‘मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाचा’ (स्मार्ट) शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते गुरुवार, १० सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. सदर कार्यक्रम ऑनलाईन होणार असून त्याचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या यु-ट्यूब चॅनेलवरून करण्यात येणार आहे. त्याची लिंक https://www.youtube.com/c/ agriculturedepartmentgom अशी आहे. जिल्ह्यातील सर्व पुरस्कार प्राप्त शेतकरी, प्रगतशिल शेतकरी, कृषि विभाग व कृषि विज्ञान केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी यांनी या कार्यक्रमात ऑनलाईन स्वरूपात सहभागी व्हावे.
या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवून या प्रकल्पाची माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत अल्प कालावधीत पोहचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावर यांनी केले आहे.




