41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home राजकीय कंगना तर बहाना,महाराष्ट्रात भाजपला हवे राष्ट्रपती शासन

कंगना तर बहाना,महाराष्ट्रात भाजपला हवे राष्ट्रपती शासन

0
2799

blank

मुंबई/गोंदिया ,दि.10– बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष पेटला आहे. यातच कंगनाचे समर्थन करण्यासाठी सुशांत सिंग राजपूतची बहिण श्वेता सिंह किर्ती पुढे आली आहे. श्वेता थेट महाराष्ट्रात राम राज्य येण्यासाठी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा वापरली आहे. श्वेता सिंहच्या या पोस्टवर चाहत्यांनीही अनेक कमेंट केल्या आहेत.मात्र  कंगनाने मुंबईत आल्यानंतर  मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा एकेरी उल्लेख करुन टीकास्त्र सोडले त्यावर ती गप्प राहिल्याने हा एक महाराष्ट्रापती राजकीय षडयंत्रच रचले गेल्याचे स्पष्ट होत आहे.

जमशेदपूर येथील आमदार सरयू राय यांनीही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे.शरयू राय यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, कंगना राणौत हिचं घर ज्यारितीने बीएमसीने तोडलो त्यावरुन त्याठिकाणी संविधानाचे रक्षण करणारे कोणी नाही हे सिद्ध होते असे म्हटले मात्र मुख्यमंत्री व महाराष्ट्राला पाकव्याप्त म्हटल्यावरही कंगणाची चूक लक्षात न येणारे हे संविधानाचे रक्षणकर्ते कसे असाही प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.  महाराष्ट्रातील भाजपा नेते नारायण राणे यांनीही काही महिन्यांपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. त्यामुळे कंगनाच्या आडून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे भाजप राजकारण करतेय का? अशी शंका निर्माण झाली आहे.महाराष्ट्रात सत्तेपासून दूर गेलेल्या भाजपला सत्तेची हाव असल्याचे या सर्वावरून दिसून येत असून महाराष्ट्र व मुंबईची बदनामी करुन पीओके असल्याच्या उल्लेक करणार्या केंद्रीय गृहमंत्रालया वाय दर्जाची सुरक्षा देतेय यावरुन केंद्राचेही महाराष्ट्र सरकार पाडण्यासाठी व राज्यातील परिस्थिती बिघडवण्यासाठी काम सुरु असल्याचेच दिसून येत आहे.तर राज्यपाल जे केंद्राला अहवाल सादर करण्याची तयारी करीत आहेत,त्यांनाही महाराष्ट्राचा अवमान कंगनाने केल्याचे दिसून येत नाही,यावरुनच सगंळ राजकारण आधीच ठरलं असल्याचे दिसून येत आहे.

blank