
गोंदिया,दि.15:-तालुका कृषी अधिकारी वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (NFSM) अंतर्गत ग्राम माकडी येथे शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.या ७ व्या शेती शाळेत कृषी पर्यवेक्षक रवींद्र खुजे यांनी भेट दिली. महिला शेतकरी विद्यार्थी म्हणून २५ शेतकरीसह ग्राम पंचायत पदाधिकारी यांनी सहभाग घेतला.
शेती शाळेत कृषी पर्यवेक्षक रवींद्र खुजे यांनी पीक विमा,गोपीनाथ मुंडे अपघात विमा या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.शेती शाळेत तुडतूड्याचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
धान पिकावर हिरवे तुडतुडे, तपकिरी तुडतुडे, पांढऱ्य तुडतुडे कीड यांची ओळख व जीवनक्रम मार्गदर्शन तसेच उपाय करिता आवश्यक ओषधी ,फेरोमेन ट्रॅप चे महत्व,पट्टा पद्धत,श्री पद्धत याबाबत मार्गदर्शन कृषी सहायक रोशन एच. लिल्हारे यांनी केले.

शेती शाळेत उपस्थित गोपाल पांडेल, यांनी तुडतुडे किडीने भात पिकावर होणारे लक्षणे बाबत माहिती देऊन, दशपर्णी अर्क,जीवामृत व कीडनाशके वापरताना घ्यवयाची काळजी , विषबाधा झाल्यास दक्षतेबाबत माहिती दिली.
महिला शेतकरी संगीता भगत, सरस्वताबाई नागपुरे ,त्रिवेणी भरत हनवते,विद्या सुरेश तुरकर व उपस्थित महिला शेतकरी यांनी शेतीशाळा मध्ये यापूर्वी झालेल्या माहितीची इतिरुत्ती गट प्रमुख नुसार सादर केली.शेतीशाळा सोबतच सांघिक खेळ मध्ये संगीत खुर्ची स्पर्धा खेळ घेण्यात आले.विजेत्याला बक्षीस स्वरूपात भेट वस्तू देऊन सर्व शेतकरी यांनी शुभेच्छा दिली.शेतीशाळा योग्य सहकार्य साध्य करण्यास लुरेंद्र ठाकरे,रामप्रसाद रहांगडाले , गौरव नागपुरे यांनी सहकार्य केले.





