
चंद्रपूर-कोरोनाच्या महामारी मुळे मागील ४ महिन्यांपासून व पावसाळ्यात ३ महिने असे सात महिने बंद असलेल्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कोर क्षेत्रातील पर्यटन १ ऑक्टोंबर पासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे.
केंद्र व राज्य शासनाने लॉकडाऊन मध्ये शिथीलता दिल्यामुळे ताडोबाच्या व्यवस्थापना च्या उत्पन्नात भर मिळावा, वन्यजीव प्रेमी व पर्यटकांना जंगल सफारी का आनंद घेता यावा म्हणून राज्य शासनाने लॉकडाउनच्या अटी व शतीर्चे पालन करून १ जुलाई २0२0 पासून बफर क्षेत्रात पर्यटनाला परवानगी देण्यात आली होती मात्र पावसाळ्यात नेहमी प्रमाणे कोर क्षेत्र बंद ठेवण्यात आलेला होता. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन (सफारी) दि. १ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहे. राज्य सरकार व एनटीसीए यांच्या दिशा निर्देशानुसार काही उपाययोजनांचे अधिन राहून करण्यात येत आहे., नियमितपणे मागदर्शक व ४ – पर्यटक एवढयाच, एका जिप्सी वाहनात १ – वाहन चालक, १ व्यक्तींना प्रवेश दिला जाईल., १0 वर्षा खालील व ६५ वर्षावरील व्यक्तींना तसेच गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक राहील., प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटक, जिप्सी चालक, मार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मल स्कॅनर / ईन्फ्रारेड थमार्मीटरने तपासण्यात येईल. हे सर्वसाधारण असल्यासच प्रवेश देण्यात यावा., ताप-सर्दी-खोकला असलेल्या, आजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नजीकच्या कोविड रुग्णालयात दिली जाईल., प्रत्येकानी चेहर्यावर मास्क लावणे आवश्यक राहील व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहील, मास्क शिवाय प्रवेश द्वारातून प्रवेश दिल्या जाणार नाही., कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्क, हातमोजे, फेस शिल्ड पाण्याच्या बॉटल्या, ईत्यादी साहित्य वन क्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल., पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायझरने हात निर्जतुक करणे बंधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सी मध्ये बसू दिले जाणार नाही / प्रवेश दिला जाणार नाही., प्रवेश द्वारावर येण्यापूर्वी जिप्सी धारकांनी त्यांच्या जिप्सी मध्ये बसणार्यांसाठी सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक राहील.,जिप्सी धारकांनी जिप्सीची प्रवेश द्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफ सफाई व सॅनिटाईझ करणे आवश्यक राहील., पर्यटकांसाठी स्वच्छता गृहे स्वच्छ ठेवण्यात येतील., प्रत्येक वापरा नंतर स्वच्छता गृहे निजुर्तीकरण करण्यात येईल., पर्यटन प्रवेशद्वारावर जिप्सीचे ( टायर बाथ) करण्याची सुविधा असणार असून तसे करणे बंधनकारक राहील. या व्याघ्र प्रकल्पात पर्यटनासाठी येणा?्या सर्वांसाठी या व्याघ्र प्रकल्पाचे, राज्य शासन, केंद्रशासन, स्थानिक प्रशासनाचे नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.