35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ महाप्रज्ञा बुध्द विहाराला शीतशवागार मृतदेह ठेवण्याचे फ्रीजर दान

महाप्रज्ञा बुध्द विहाराला शीतशवागार मृतदेह ठेवण्याचे फ्रीजर दान

0
23

blank

तिरोडा-डॉ..बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती तिरोडाच्या वतीने शीतशवागार मृतदेह ठेवण्यासाठी दान देण्यात आले ते महाप्रज्ञा बुद्ध विहाराचे अध्यक्ष प्रा. के एफ मेश्राम यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आले.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून विजय बन्सोड, राजेश गुनेरीया,जितेंद्र डहाटे,अतुल गजभिये,अरविंद उके, कृष्णा मेश्राम,तेजराम मेश्राम,टी.एम. वैद्य, महेंद्र बडगे,संजय जांभूळकर, महेंद्र वालदे,के.के. वैद्य आदी मान्यवर उपस्थित होते.
*तिरोडा तालुक्यात आपला समाज बहुसंख्य आहे. एखाद्या घरी मृत्यू झाल्यास आणि मृत शरीराला आप्तस्वकीय येईपर्यंत ठेवायचे असल्यास अशावेळी फ्रीजरची नितांत गरज पडायची. ही गरज लक्षात घेवून हे फ्रिजर खरेदी करण्यात आले आहे. यावेळेला मोठ्या प्रमाणावर नागरिक व बौद्ध बांधव उपस्थित होते.

blank