34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज 133 रूग्णांना डिस्चार्ज

भंडारा जिल्ह्यात आज 133 रूग्णांना डिस्चार्ज

0
413

blank

भंडारा दि.21 : जिल्ह्यात आज 133 रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 2481 झाली असून 24 पॉझिटिव्ह रुग्णांची आज नव्याने नोंद झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 3896 झाली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 12, साकोली 00, लाखांदूर 06, तुमसर 00, मोहाडी 00, पवनी 02 व लाखनी तालुक्यातील 04 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 2481 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 3896 झाली असून 1329 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 86 झाली आहे.

आज 21 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 186 व्यक्ती भरती असून 1867 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून  डिस्चार्ज  देण्यात आला आहे.

blank