37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ नवनियुक्त सीईओ प्रदिपकुमार डांगे यांनी स्विकारला जि.प.चा पदभार

नवनियुक्त सीईओ प्रदिपकुमार डांगे यांनी स्विकारला जि.प.चा पदभार

0
1610

blank

गोंदिया,दि.28::गोंदिया जिल्हा परिषदेचे गेल्या जून महिन्यापासून रिक्त असलेल्या मुख्य कार्य़कारी अधिकारी पदावर प्रदिपकुमार डांगे यांची पदोन्नती भारतीय प्रशासनिक सेवेत झाल्याने पहिली नियुक्ती गोंदिय़ा जिल्हा परिषदेत करण्यात आली होती.त्यानुसार प्रदिपकुमार डांगेे यांनी आज सोमवारला(दि.28)मध्यानानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश खवले यांच्याकडून जिल्हा परिषदेचा पदभार स्विकारला आहे.डांगे यांना भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील सर्वच परिस्थीतीची जाणिव असल्याने विस्कटलेला गोंदिया जिल्हा परिषदेचा डोलारा आणि विकासात्मक कामावर भर देणार अशी अपेक्षा केली जात आहे.सोबतच बदली होऊनही गेल्या दोनवर्षापासून एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्यांना बदली ठिकाणी हलवून नव्या कर्मचार्यांना त्या जागेवर आणून त्यांनाही शिकण्याची संधी देतील अशी अपेक्षा कर्मचारी वर्ग व्यक्त करीत आहेत.

blank