
गोंदिया,दि.०३-गोंदिया येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेतून आज प्राप्त अहवालानुसार २८२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. तर नव्याने ९६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.
आज जे ९६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. यामध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-६५, तिरोडा तालुका-६, गोरेगाव तालुका-२, आमगाव तालुका-२, सालेकसा तालुका-१, देवरी तालुका-८, सडक/अर्जुनी तालुका-६ व अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील सहा रुग्णांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले आतापर्यंतचे रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका-४३१८, तिरोडा तालुका-९९४, गोरेगाव तालुका-३१८, आमगाव तालुका-४५८, सालेकसा तालुका-३४८, देवरी तालुका-२८३, सडक/अर्जुनी तालुका-२५१, अर्जुनी/मोरगाव तालुका-२८८ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- ८९ रुग्ण आहे. असे एकूण ७३४७ रुग्ण बाधित आढळले आहे.
ज्या २८२ रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे. त्यामध्ये गोंदिया तालुका-१८०, तिरोडा तालुका-६१, गोरेगाव तालुका-८, आमगाव तालुका-८, सालेकसा तालुका-६, देवरी तालुका-४, सडक/अर्जुनी तालुका-७, अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील आठ रुग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ५५९५ रुग्णांनी मात केली आहे. यामध्ये गोंदिया तालुका -३४२२, तिरोडा तालुका- ७५०, गोरेगाव तालुका-२२६, आमगाव तालुका-३२९, सालेकसा तालुका-१६८, देवरी तालुका-१८०, सडक/अर्जुनी तालुका-२०१, अर्जुनी/मोरगाव तालुका-२३९ आणि इतर-८० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या १६४८ झाली आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -८३४, तिरोडा तालुका-२२९, गोरेगाव तालुका-८९, आमगाव तालुका-१२३, सालेकसा तालुका -१७८, देवरी तालुका-१०१, सडक/अर्जुनी तालुका- ४७, अर्जुनी/मोरगाव तालुका-४७ आणि इतर-०० असे एकूण १६४८ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
क्रियाशील रुग्णांपैकी ५६६ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-२६९, तिरोडा तालुका-५६, गोरेगाव तालुका-५२, आमगाव तालुका-२५, सालेकसा तालुका-७१, देवरी तालुका-४४, सडक/अर्जुनी तालुका-९, अर्जुनी/मोरगाव तालुका -४० व इतर ०० असे एकूण ५६६ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
आतापर्यंत १०४ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका-६२, तिरोडा तालुका-१५, गोरेगाव तालुका-३, आमगाव तालुका-६, सालेकसा तालुका-२, देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व इतर ठिकाणच्या नऊ रुग्णांचा समावेश आहे.
आज ज्या दोन कोरोना बाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामध्ये ७० वर्षीय रुग्ण राहणार लक्ष्मीनगर गोंदिया व ७० वर्षीय रुग्ण राहणार मुर्री गोंदिया यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३०८२२ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २४०९१ नमुने निगेटिव्ह आले. तर ४७०० नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १५७ नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून १८७४ नमुन्यांचा अहवाल अनिश्चित आहे.
विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात ३ व्यक्ती आणि गृह विलगिकरणात २८८ व्यक्ती अशा एकूण २९१ व्यक्ती विलगिकरणात आहेत. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २७४१४ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २४७८९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २६२५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ९५ चमू आणि ८७ सुपरवायझर, ८७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-५, आमगाव तालुका-४, सालेकसा तालुका-४, देवरी तालुका-२०, सडक/अर्जुनी तालुका-५, गोरेगाव तालुका-१८, तिरोडा तालुका-२५ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-६ असे एकूण ८७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.





