34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता पोलिसांच्या धाड कारवाई; ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांच्या धाड कारवाई; ३.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

0
88

blank

तिरोडा,दि.05ः-शहरासह तालुक्यात अवैध दारूविक्री जोमात सुरू आहे. अशी माहिती मिळताच तिरोडा पोलिसांनी जिल्हा पोलिस अधिक्षक व उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन यादव यांच्या मार्गदर्शनाखाली धाड कारवाई मोहिम राबविली. दरम्यान तीन दारू विव्रेâत्यांकडून ३ लाख ५० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन अवैध दारूविव्रेâत्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रशिला श्रावण कनोजे (५०), वनमाला भिमराव झाडे (८०) व शाबीर रहिम खॉ पठाण (५२) असे आरोपींची नावे आहेत. तिरोडा शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केली जात आहे. अशी माहिती तिरोडा पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर धाड कारवाई मोहिम राबविण्यात आली. दरम्यान चंद्रशिला कनोजे हिच्या घरून ९७ हजार ५०० रूपये, वनमाला झाडे या महिलेच्या घरून १ लाख ३१ हजार तर साबीर पठाण याच्याकडून १ लाख २० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या नेतृत्वात पो.उपनि.राहुल साबळे, पो.ना.श्रीरामे, बिसेन, शेंडे यांनी
केली.

blank