
अर्जुनी मोरगाव,दि.05,ःगडचिरोली जिल्ह्यातील कराड वैरागड येथील चेतन श्रावण ठाकरे या पंचवीस वर्षीय युवकाचा इटीयाडोह मुख्य कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना चार ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सहा वाजता दरम्यान घडली.
पोलीस स्टेशन आरमोरी तालुका कुरखेडा येथील कराड वैरागडचे पंधरा तरून मोटरसायकलने पार्टी करण्यासाठी गोठणगावला आले होते.इटीयाडोह या ठिकाणी पर्यटक मोट्या प्रमाणावर सुट्या घालविण्यासाठी,निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात.वाढदिवस साजरा करतात.
सदर युवक पार्टी आटोपल्यानंतर पार्टीसाठी आणलेली भांडी धुण्यासाठी कालव्याच्या काठावर भांडी धूत असताना चेतनचा तोल जाऊन तो कालव्यात पडला.कालव्याच्या प्रवाह तेज असल्यामुळे तो कालव्यात वाहून गेला.आणि त्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू झाला.केशोरी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दीपक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक ठाणेदार बी.यस.मुंडे हवालदार बुराडे, हवालदार कापगते ,यांनी मोका पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीनंतर कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.





