43.7 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home गुन्हेवार्ता पिंपळगाव येथे पकडली ग्राम दक्षता समितीने अवैध दारू

पिंपळगाव येथे पकडली ग्राम दक्षता समितीने अवैध दारू

0
169

blank

अर्जुनी मोरगाव,दि.06ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील पिंपळगाव येथे गेल्या अनेक दिवसापासून तंटामुक्त समिती ग्राम दक्षता समिती आणि ग्रामपंचायतच्या मार्फत गावात दारूबंदीचे आव्हान करण्यात आले होते. या आवाहनानुसार गावामध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून दारूबंदी आहे. तरीही काही सामाजिक तत्त्वे स्वतःचे आर्थिक हितसंबंध जोपासण्यासाठी गावातील समित्यांना त्यांच्या आवाहनाला दुर्लक्ष करीत छुप्या मार्गाने अवैध दारू विक्री करतात असा आरोप तंटामुक्ती अध्यक्ष दादाजी ब्राम्हणकर आणि कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विलास फुंडे यांनी लावला.विक्रेत्यांना अनेकदा समज देण्यात आली, मात्र त्यांनी गावकऱ्यांच्या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. 2 ऑक्टोंबर रोजी ग्राम दक्षता समितीला गावातील रमेश विजय गजभिये (30) नामक व्यक्ती अवैध दारू विक्री करतो अशी माहिती मिळाली.या माहितीच्या आधारावर पाळत ठेवून ग्राम दक्षता समितीच्या महिलांनी अवैध दारू विक्रेत्याला रंगेहात पकडले. अवैध दारु विक्रेत्यांकडून 180 एम एलचे 109 देसी दारूचे पव्वे जप्त केले.सदरची माहिती पोलीस स्टेशन अर्जुनी-मोरला देण्यात आली.त्यानंतर ठाणेदार महादेव तोदले यांच्या नेतृत्वात पोलिसांची चमू घटनास्थळी दाखल होऊन दारू विक्रेत्याला मुद्देमालासह अटक करून गुन्हा दाखल केला.

blank