33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या,मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्या,मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर

0
90

blank

गोंदिया,दि.07: ओबीसी प्रवर्गातील बहुसंख्य कुटुंबांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे व ही कुटुंब आपल्या उदरनिर्वाहासाठी शेती अथवा मोलमजुरी वर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत या प्रवर्गातील अनेक विद्यार्थ्यांच्या इच्छा असूनही शिष्यवृत्ती अभावी आपले पुढील शिक्षण पूर्ण करण्यासाठी विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसेच काही व्यावसायिक पाठ्यक्रमांना ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू नसल्याने अशा बिकट व हलाखीच्या परिस्थितीत काही व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेण्यासाठी डोक्यावर कर्जाचे ओझे पेलवावे लागते. तरी एकूण ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांची होणारी अडचण बघता एससी, एसटी प्रवर्गाप्रमाणे शिष्यवृत्ती लागू करून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना न्याय मिळावा याकरिता माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती गोंदिया शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकारी गोंदिया यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी रेती अभावी घरकुल लाभार्थ्यांची होणारी अडचण व जिल्ह्यातील वाढत्या रेती चोरी प्रकरणाबाबत जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांच्याशी चर्चा केली यावेळी बिंबीसार शहारे जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार व पत्रकार संरक्षण समिती गोंदिया, अतित डोंगरे जिल्हा उपाध्यक्ष, घनश्याम राऊत जिल्हा सचिव, कुंजीलाल मेश्राम जिल्हा संपर्कप्रमुख, मिथुन गजभिये जिल्हा कार्याध्यक्ष, विलास चाकाटे देवरी तालुकाध्यक्ष व अजय नंदागवळी तिरोडा यांची उपस्थित होते.

blank