
अर्जुनी मोरगाव,दि.८.-ओबीसी संघटनांच्यावतीने आज (दि.८)राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करण्यात आले.मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करु नये,ओबीसीची स्वतंत्र जनगणना करण्यात यावी या मागणी सह इतर पंधरा मागण्यांसाठी ओबीसी समाजाच्या संघटनांनी थाळी बजाव आंदोलन राज्यात विविध ठिकाणी केले.अर्जुनी मोरगाव येथे ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.या आंदोलनात राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे पदाधिकारी सहभागी झाले.
राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी महासंघाचे तालुकाध्यक्ष प्रा.सदानंद मेंढे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.यावेळी ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे सचिव नरेंद्र बनकर, राधेश्याम कापगते,अरविंद नाकाडे,दिलीप लोधी,श्रीकृष्ण कहालकर,गोवर्धन लंजे,राजेश नागरीकर,राजेंद्र राखडे,किशोर लंजे,आर.एस.संग्रामे उपस्थित होते.





