37.1 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ जिल्हाभरात ओबीसी समाजाचा ‘घंटानाद’ आंदोलन

जिल्हाभरात ओबीसी समाजाचा ‘घंटानाद’ आंदोलन

0
134

blank

गडचिरोली,दि.09ः ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांचे निराकरण करण्यासाठी गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तसहीलदार यांच्या कार्यालयासमोर गुरूवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत ‘थाळी वाजवा’ आंदोलन करून ओबीसी समाजाच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाटविण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, ओबीसी समाजाची २0२१ मध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात यावा. केंद्रामध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावे. अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसी प्रवर्गाला लावलेली क्रिमिलेअरची असंविधानिक अट रद्द करण्यात यावी. बीपी शर्मा कमिटीचा क्रिमिलियर संदर्भातील अहवाल रद्द करण्यात यावा. नचिपण व स्वामीनाथ आयोगाच्या सर्व शिफारशी लागू करण्यात याव्यात. महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना संयुक्त भारतरत्न घोषित करण्यात यावे या मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात येणार आहे. राज्य शासनाकडे ओबीसी समाजाची २0२१ मध्ये होऊ घातलेली जातनिहाय जनगणना केंद्र सरकार करीत नसेल तर महाराष्ट्र शासनाने आपल्या स्तरावर करून ओबीसींना न्याय द्यावा. मराठा समाजाच्या आरक्षणास ओबीसींचा विरोध नाही, परंतु ओबीसींच्या १९ टक्के आरक्षणातून मराठय़ांना आरक्षण देण्यात येऊ नये.
महाराष्ट्रातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नंदूरबार, धुळे, ठोणे, नाशिक व पालघर या आठ जिल्ह्यातील ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे. १00 टक्के बिंदुनामावली केंद्र सरकारच्या २/७/९७ व ३१/१/२0१९ च्या मार्गदर्शक सुचनांनुसार त्वरीत सुधारीत करण्यात यावी. ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वसतिगृह त्वरीत सुरू करण्यात यावी. ओबीसी समाजाचा रिक्त पदांचा अनुशेष त्वरीत भरण्यात यावा. ओबीसी कर्मचार्‍यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करण्यात यावे. ओबीसी समाजासाठी घरकूल योजना सुरू करण्यात यावी. ओबीसी शेतकरी, शेतमजुरांना वयाच्या ६0 वर्षानंतर पेंशन योजना लागू करण्यात यावी. एससी/एसटी प्रमाणे ओबीसी शेतकर्‍यांना १00 टक्के सवलतीवर राज्यात योजना सुरू करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.
गडचिरोली- येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांच्या नेतृत्वात इंदिरा गांधी चौकातून खासदार अशोक नेते यांच्या कार्यालयामोर घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले व त्यांनतर विविध मागण्यांचे निवेदन खा. नेते यांना देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दादाजी चुधरी, सचिव प्रा. देवानंद कामडी, रमेश भुरसे, सुरेश भांडेकर, विनायक झरकर, विलास पारखी, जनार्धन ताकसांडे, रामकृष्ण ताजणे, दत्तात्रय खरवडे, सतीश विधाते, पांडुरंग घोटे यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी ओबीसी नागरिक सहभागी झाले होते.
कुरखेडा – राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा कूरखेडाच्या वतीने ओबीसी समाजाचा विविध समस्येकडे शाशनाचे लक्ष वेधण्याकरीता आज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर घंटानाद आंदोलन करीत मूख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले. या आंदोलनात प्रा. दशरथ आदे, प्रा. पीसाराम खोपे, नगराध्यक्ष रवींद्र गोटेफोडे, प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, विलास गावंडे, प्राचार्य पुंडलिक आकरे, नवनाथ धाबेकर, बंडू लांजेवार, जगदिश दखने, शामराव सोनूले, चरण रासेकर, ईश्‍वर ठाकूर, अनिकेत आकरे, श्रीराम माकडे, व्यंकट हरडे, कवियत्री संगीता ठलाल, प्रिती गावंडे, रेखा मोहने, मीनाताई दवंडे, चंद्रकला दवंडे, उमदेव देशमुख व बहूसंख्येनी ओबीसी कार्यकर्ते उपस्थीत होते.
चामोर्शी – तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आज, गुरुवार ८ऑक्टोबर रोजी आ. देवराव होळी व एसडीओ मार्फत समाजातील विविध समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले . निवेदन देताना ओबीसी भाजपा आघाडी तालुका अध्यक्ष संजय खेडेकर, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, महामंत्री साईनाथ बुरांडे, संतोष चावरे, वामन कीनेकार, संदीप तिमाडे, अनिल आभारे, मनोज पोरटे, सदाशिव वाघरे, भानुदास कीनेकार, दिलीप चित्ताअरकर, सातारा, गोकुळ झाडे, अशोक कीनेकार, खुशाल कापगते यांच्यासह ओबीसी समाज बांधव उपस्थित होते.
अहेरी – येथे राष्ट्रीय ओबीसी महासंघ अहेरीच्यावतीने आ. धर्मरावबाबा आत्राम, तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
देसाईगंज – येथे भाजपा ओबीसी मोर्चा देसाईगंजच्यावतीने ओबीसींच्या विविध मागण्यांचे निवदेन तहसीदारामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनिल पारधी, राज्य बेरोजगार संघटनेचे अध्यक्ष महेश झरकर, भाजपा तालुकाध्यक्ष राजु जेठाणी, महामंत्री वसंता दोनाडकर, महाक योगेश नाकतोडे, ओबीसी मोर्चाचे महामंत्री चेतनदास विधाते, शामराव अनोले, भागवत मेर्शाम, रामचंद्र ठाकरे, प्रवीण जेंगठे यांच्यासह ओबीसी कार्यकर्ते उपस्थित होते.
धानोरा – येथे ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून विविध मागणीचे निवेदन तहसीलदार नारायण भगत यांचे मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यात आले. यावेळी ओबीसी महासंघाचे तालुकाध्यक्ष देवानंद भेंडारे, जि.प. सदस्य विनोद लेनगुरे, वसंतराव गडपायले, राजू मोहुर्ले, तुकाराम सहारे, महेश चिमूरकर, राजू रामपूरकर, सदाशिव सहारे, भाष्कर सोनुले, प्रमोद सहारे, किरण सोनुले, जयश्री सहारे, पुजा गावतुरे, अल्का सहारे, प्रशांत निकेसर, रूषी मांदाळे, शामराव मोहुर्ले यांच्यासह ओबीसी महिला व पुरुष उपस्थित होते.

blank