34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home विदर्भ चिचगडतील दारुबंदीच्या आशा पल्लवित,प्रशासन लागले कामाला

चिचगडतील दारुबंदीच्या आशा पल्लवित,प्रशासन लागले कामाला

0
501

blank

चिचगड,दि.09:- चिचगडसह परिसरातील गावातील महिलांसह नागरिकांनी मागणी केलेल्या दारुबंदीला प्रशासनाने सहकार्य करण्याचे ठरविल्याने परिसरात दारुबंदी होण्याबाबतच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत.अनेकदा निवेदन देऊन सुध्दा प्रशासन लक्ष देत नसल्याने महिलांनी आंदोलनात्मक भूमिका घेण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासनाला जाग आली.परिसरातील गावामध्ये अवैधरित्या विक्री होत असलेली दारु आणि दारु दुकाने बंद व्हावी यासाठी सातत्याने महिलामंडळ लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसारीतही केले होते.त्यातच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे  ३९८ महीलानीं दि. २८ जुर्ले रोजी चिचगड येथील छाया भोजराज मडावी,निर्मला शिवलाल मेढें,चंन्द्रकला भोजराज गायकवाड यानी नियमानुसार तक्रार अर्ज सादर केले होते.त्या अर्जानुसार चिचगड व त्या परसरातील महिलांनीं दिलेल्या निवेदनाची सत्यता काय पडताळणीकरीता १२ ऑक्टोबंर २०२० ला सकाळी १० ते १५.०० वाजेपर्यंत, दि. १३ ऑक्टोबंर २०२० ला सकाळी १० ते १५.०० वाजेपर्यंत व दि.१४ ऑक्टोबंरला पण सकाळी १० ते १५.०० वाजे पर्यंत कागदपत्रांची पडताळणीसाठी वेळ देण्यात आली आहे.अर्जदार महिला पडताळणीच्या दिवशी हजर न राहिल्यास दुसर्या इतर कुठल्याही दिवशी पडताळणी होणार नसल्याचेही राज्य उत्पादन शुल्क विभागाने पत्रात म्हटले आहे.

blank