33.1 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ कोब्रा व तस्कर जातीच्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवनदान

कोब्रा व तस्कर जातीच्या सापाला सर्पमित्रांनी दिले जीवनदान

0
291

blank

अर्जुनी मोरगाव,दि.10ः- तालुक्यातील ताडगाव येथील मुनेश्वर नाकाडे हे रात्री अंगणात टेहळणी करीत होते.अचानक अंगणामध्ये आज(09) रात्री नऊ वाजता दरम्यान अंगणामध्ये काळा कुट्ट रंगाचा मोठा साप फणा काढून दिसून आला.सापाचा फना आणि काळा रंग पाहून परिवारातील सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.लगेच अर्जुनी मोरगाव येथील सर्पमित्र राहुल लाडे,मुकेश पवार,जावेद शेख यांना प्राचारण करण्यात आले.सर्पमित्रांनी लगेच घटनास्थळी पोहोचून सदर सापाला ताब्यात घेतले.हा साप 4.3 फूट लांबीचा होता.तर याच रात्री अर्जुनी नगरातील गणेश नगर येथील प्रदीप शाहारे यांच्या घरी काल(09) रात्री साढे दहाच्या सुमारास घरामध्ये साप दबा धरून बसल्याचे घरच्या सदस्यांनी पाहिले.भीतीपोटी घरातील सर्व मंडळी घराबाहेर निघाली.याची माहिती सर्प मित्र राहुल लाडे यांना मिळताच ते शहारे यांच्या घरी पोहचले.
सर्पमित्रांनी दबा धरून बसलेल्या सापाला पकडून ताब्यात घेतले.सदर साप हा तस्कर जातीचा असून त्याची लांबी 2.1 फूट होती.हा साप तस्कर (शास्त्रीय नावःElaphe helena)हा भारतीय उपखंडात आढळणारा अतिशय निरुपद्रवी बिनविषारी साप आहे. इंग्रजीत याला ट्रिंकेट अथवा साधा साप म्हणतात.अतिशय शांत स्वभावाचा हा साप हाताळायला अतिशय सोपा आहे.तस्कर चा मराठीत अर्थ तस्करी अथवा चोरी करणारा. हा लांबीला साधारणपणे १/२ ते १ मीटर पर्यंत असतो. जाडीला १ इंचापर्यंत असतो. अंगावर पट्टे असतात व पट्टे सुरेख बुद्धीबळातील पटासारख्या छोट्या काळ्या पांढर्‍या चौकोनांनी भरलेला असतो अशी माहिती सर्पमित्र राहुल लाडे नी दिली यावेळी सर्पमित्र मुकेश पवार उपस्थित होते.या दोन्ही सापांना सुकळी जंगल परिसरात सोडण्यात आले.

blank