34.7 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home गुन्हेवार्ता चोरीच्या तक्रारीनंतरही पोलिसांचे दुर्लक्ष;सेजगाव येथील प्रकार

चोरीच्या तक्रारीनंतरही पोलिसांचे दुर्लक्ष;सेजगाव येथील प्रकार

0
440

blank

गोंदिया : गंगाझरी पोलिस ठाण्यातंर्गत सेजगाव (कला) येथे फिर्यादीच्या घरी चोरी झाली होती. दरम्यान फिर्यादीने संशयित आरोपीच्या नावासह गंगाझरी पोलिस ठाणे येथे २४ सप्टेंबर रोजी तक्रार दाखल केली. मात्र, त्या तक्रारीची दखल न घेता संशयित आरोपीतांना संबधित पोलिस ठाण्यातील कर्मचारी वाचवित तर नसल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे.
सविस्तर असे की, गंगाझरी पोलिस ठाण्यातंर्गत सेजगाव (कला) येथे फिर्यादी अर्जदार माधो गठलकार यांच्या येथे चोरी झाली. यामध्ये १ लाख २२ हजार रूपये रोख तसेच दीड तोळे सोन्याची साखळी, एक एकदानी, सोन्याची अंगठी आदि गैरअर्जदार विवेक वैद्य, सौरभ गभणे, शिला वैद्य, शंतनु गभणे, चैताली गठलकार सर्व रा.काचेवानी तसेच धिरज वैद्य रा.नागपूर यांनी चोरून नेल्याची तक्रार फिर्यादी अर्जदार माधव गठलकार यांनी २४ सप्टेंबर रोजी गंगाझरी पोलिस ठाणे तसेच जिल्हा पोलिस अधिक्षकांना केली. मात्र, त्या तक्रारीच्या नंतरही गंगाझरी पोलिसांनी या प्रकरणी आजपर्यंत कोणतेही कारवाई केली नसल्याने या प्रकरणी आरोपींना वाचविण्याचा प्रकार पोलिस प्रशासन करीत असल्याचा आरोप फिर्यादीने केला असून या प्रकरणी आपल्याला त्वरित न्याय देण्यात यावा, अशी मागणीही फिर्यादी अर्जदार माधव गठलकार यांनी केला आहे.

blank