गोंदिया,दि.१२ ) ऑक्टोबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे. औषधोपचारातून कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वेगाने वाढतांना दिसत आहे.आज १२ऑक्टोबर रोजी सोमवारी गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून प्राप्त अहवालावरून आणखी ६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. तर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेले ९६ रुग्ण औषधोपचारातून कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. काल रात्री गोंदिया शहरातील न्यू लक्षमीनगर येथील ६५ वर्षीय रुग्णाचा खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्ह्यात आज जे ६५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आज आढळून आले. ते तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-२२, तिरोडा तालुका -०० , गोरेगाव तालुका-०१,आमगाव तालुका-०१,सालेकसा तालुका-०३
,देवरी तालुका ०४,सडक/अर्जुनी तालुका- १७,अर्जुनी/मोरगाव- ११ असे आहेत.
आतापर्यंतचे आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका- ४६५७,तिरोडा तालुका -१०३१, गोरेगाव तालुका -३३०, आमगाव तालुका -५१८, सालेकसा तालुका -३६०, देवरी तालुका-३१३, सडक/अर्जुनी तालुका-३०८,अर्जुनी/मोरगाव तालुका-३१५ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- ८९ रुग्ण आहे.असे एकूण ७९२१ रुग्ण आढळले आहे.
९६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी कोरोनावर आज मात केली.यामध्ये गोंदिया तालुका-७८, तिरोडा तालुका -००, गोरेगाव तालुका-०६, आमगाव तालुका -०२, सालेकसा तालुका-०३, देवरी तालुका-००, सडक/अर्जुनी तालुका -०२ आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील ५ रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत जिल्ह्यातील ७२०१ रूग्णांनी औषधोपचारातून कोरोनावर मात केली.ते रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका – ४१६२,तिरोडा तालुका- ९८३, गोरेगाव तालुका-३१३,आमगाव तालुका-४७६,सालेकसा तालुका- ३४७,देवरी तालुका-२८२,सडक/अर्जुनी तालुका-२७०,अर्जुनी/मोरगाव तालुका-२८८ आणि इतर-८० रुग्णांचा समावेश आहे.
कोरोना क्रियाशील रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -४३०,तिरोडा तालुका-३३, गोरेगाव तालुका- १३,आमगाव तालुका-३६, सालेकसा तालुका -११, देवरी तालुका – २९, सडक/अर्जुनी तालुका- ३५,अर्जुनी/मोरगाव तालुका-२५ असे एकूण ६१२ रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.
क्रीयाशील रुग्णांपैकी २४९ रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-१८८, तिरोडा तालुका-०८, गोरेगाव तालुका-०४,आमगाव तालुका -१७,सालेकसा तालुका-०४,देवरी तालुका-०२,सडक/अर्जुनी तालुका- १५,अर्जुनी/मोरगाव तालुका -११ असे एकूण २४९ क्रियाशील रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
१०८ रुग्णांचा जिल्ह्यात आतापर्यंत मृत्यू झाला. यामध्ये गोंदिया तालुका -६५, तिरोडा तालुका-१५ गोरेगाव तालुका-४,आमगाव तालुका -६, सालेकसा तालुका-२ देवरी तालुका-२, सडक/अर्जुनी तालुका-३, अर्जुनी/मोरगाव तालुका-२ व बाहेर जिल्हा व राज्यातील नऊ रुग्णांचा समावेश आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३३३०१ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २६०१२ नमुने निगेटिव्ह आले. तर ४९६० नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १२९ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे.
गृह विलगिकरणात १७६ व्यक्ती आणि संस्थात्मक विलगीकरणात २ व्यक्ती आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २९०५९ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २६१४९ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २९१० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ३६ चमू आणि ३१ सुपरवायझर ३१ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-४, आमगाव तालुका-१, सालेकसा तालुका-२,देवरी तालुका – ३,सडक/अर्जुनी तालुका-१, गोरेगाव तालुका-५ तिरोडा तालुका -१२ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-३ असे एकूण ३१ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या १४ लाख ११ हजार ४२५ लोकसंख्येपैकी ११ ऑक्टोबरपर्यंत १३ लाख ४१ हजार ६५५ लोकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.हे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. त्यामध्ये एकूण ७५८ आजारी रूग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले.त्यापैकी २२८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यावर रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे.काही समस्या असल्यास ८३०८८१६६६६ आणि ८३०८८२६६६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.





