
गोरेगाव : तालुक्यातील घोटी येथील रहिवासी शिवसेना विभाग प्रमुख सुनील शास्त्री यांचे वडील श्री हरिभाऊ काशिनाथ शास्त्री यांचे वृद्धापकाळाने आज 13 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी सात वाजून पाच मिनिटांनी निधन झाले मृत्यूसमयी ते 89 वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवावर दुपारी एक वाजता स्थानिक पंगोली नदी मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येईल. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली, सून, नातवंडे व बराच मोठा आप्तपरिवार आहे.





