
भंडारा दि. 13 : जिल्ह्यात आज 140 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5442 झाली असून आज 109 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6953 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.26 टक्के आहे.
आज 793 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 109 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 55 हजार 673 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 6953 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.
जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 34, साकोली 04, लाखांदूर 05, तुमसर 03, मोहाडी 04, पवनी 46 व लाखनी तालुक्यातील 13 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 5442 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 6953 झाली असून 1338 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 03 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 173 झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 78.26 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.48 टक्के एवढा आहे.
जिल्हयात एकुण 03 व्यक्ती मृत्यु झाले असून त्यापैकी भंडारा तालुक्यातील 02 व्यक्ती असून एक 62 वर्षीय पुरुष व एक 45 वर्षीय पुरुष कोवीड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर येथे मृत्यु झाला तसेच पवनी तालुक्यातील एक 83 वर्षीय पुरुष कोवीड-19 पॉझिटिव्ह रुग्णांच्या आयसोलेशन वार्ड जिल्हा रुग्णालय, भंडारा येथे मृत्यु झाला
नागरीकांना आवाहन
- कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
- साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
- साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.





