
गोंदिया,दि.१३– गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज १३ ऑक्टोबर रोजी प्राप्त अहवालातुन नव्याने ११८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. उपचार घेत असलेले ११४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने सुट्टी देण्यात आली.
आतापर्यंत जिल्ह्यातील ७३१५ बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली.बाधित रुग्णांचा आरटी-पीसीआर आणि अँटिजेन चाचणीतून शोध घेण्यात येतो.आतापर्यंत आरटी-पीसीआर चाचणीतून ५०३२ आणि अँटिजेन चाचणीतून २९२५ नमुने बाधित आढळून आले आहे.
आज ११८ कोरोना बाधित रुग्ण आढळले. तालुकानिहाय पुढील प्रमाणे. गोंदिया तालुका-६३, तिरोडा तालुका -०५,गोरेगाव तालुका-०६, आमगाव तालुका-०६,सालेकसा तालुका-००, देवरी तालुका १०, सडक/अर्जुनी तालुका- ०२,अर्जुनी/मोरगाव- २६ असे आहेत.
आतापर्यंतचे कोरोना बाधित रुग्ण तालुकानिहाय. गोंदिया तालुका- ४७२०,तिरोडा तालुका -१०३६, गोरेगाव तालुका -३३६, आमगाव तालुका -५२४, सालेकसा तालुका -३६०, देवरी तालुका-३२३, सडक/अर्जुनी तालुका-३१०,अर्जुनी/मोरगाव तालुका-३४१ आणि बाहेर जिल्हा व इतर राज्यात आढळलेले- ८९ रुग्ण आहे.असे एकूण ८०३९ रुग्ण आढळले आहे.
आज ज्या ११४ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर आज मात केली.तालुका निहाय ते पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका-८३, तिरोडा तालुका -०२, गोरेगाव तालुका-०३, आमगाव तालुका -०५, सालेकसा तालुका-०१, देवरी तालुका-१३, सडक/अर्जुनी तालुका -०४ आणि अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील तीन रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यातील ७३१५ रूग्णांनी कोरोनावर मात केली.ते रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे.गोंदिया तालुका – ४२४५,तिरोडा तालुका- ९८५, गोरेगाव तालुका-३१६,आमगाव तालुका-४८१,सालेकसा तालुका- ३४८,देवरी तालुका-२९५,सडक/अर्जुनी तालुका-२७४,अर्जुनी/मोरगाव तालुका-२९१ आणि इतर-८० रुग्णांचा समावेश आहे.
क्रियाशील रुग्णांची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका -४१०,तिरोडा तालुका-३६, गोरेगाव तालुका- १६,आमगाव तालुका-३७, सालेकसा तालुका -१०, देवरी तालुका – २६, सडक/अर्जुनी तालुका- ३३,अर्जुनी/मोरगाव तालुका-४८ असे एकूण ६१६ रुग्ण कोरोना क्रियाशील रुग्ण विविध शासकीय व खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.
क्रीयाशील रुग्णांपैकी २८० रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे गोंदिया तालुका-१७३, तिरोडा तालुका-२१, गोरेगाव तालुका-०७,आमगाव तालुका -२२,सालेकसा तालुका-०६,देवरी तालुका-१३,सडक/अर्जुनी तालुका- १६,अर्जुनी/मोरगाव तालुका -२२ रुग्ण घरीच अलगिकरणात आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण ३३५८६ नमुने पाठविण्यात आले. यामध्ये २६१६५ नमुने निगेटिव्ह आले. तर ५०३२ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. १०३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहे.
गृह विलगिकरणात १५६ व्यक्ती आणि संस्थात्मक विलगीकरणात २ व्यक्ती आहे. कोरोना बाधितांचा त्वरित शोध रॅपिड अँटीजेन टेस्टमधून घेण्यात येत आहे. या चाचणीतून आतापर्यंत २९३३७ व्यक्तींचे नमुने घेण्यात आले. यामध्ये २६४१२ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले. २९२५ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळले.
जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ३१ चमू आणि २७ सुपरवायझर २७ कॅटेंटमेंट क्षेत्रासाठी नियुक्त केले आहे. यामध्ये गोंदिया तालुका-०४, आमगाव तालुका-००, सालेकसा तालुका-०२,देवरी तालुका – ०३,सडक/अर्जुनी तालुका-०१, गोरेगाव तालुका-०५ तिरोडा तालुका -१२ आणि अर्जुनी/मोरगाव तालुका-०० असे एकूण २७ कंटेंटमेंट झोन जिल्ह्यात कार्यरत आहे.
माझे कुटुंब-माझी जबाबदारी-माझी जनजागृती या मोहिमेअंतर्गत जिल्ह्याच्या १४ लाख ११ हजार ४२५ लोकसंख्येपैकी १२ ऑक्टोबरपर्यंत १३ लाख ४१ हजार ६५५ लोकांची प्रथम आरोग्य तपासणी करण्यात आली आहे.हे प्रमाण ९५ टक्के इतके आहे. त्यामध्ये एकूण ७५८ आजारी रूग्णांच्या घशाचे नमुने तपासण्यात आले.त्यापैकी २२८ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यात कोरोना वॉर रूम तयार करण्यात आली असून त्यावर रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध राहणार आहे.काही समस्या असल्यास ८३०८८१६६६६ आणि ८३०८८२६६६६ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
कोरोना चाचणी केल्यानंतर बाधित रुग्णांच्या सुविधेसासाठी सर्व रुग्णांना त्यांनी दिलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर त्याचा कोविड-१९ चा अहवाल एस एम एस द्वारे कळविण्यात येतो.हा अहवाल ग्राह्य धरावा.





