33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ हर्षा वैष्णव हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा:- राजेश निमावत

हर्षा वैष्णव हत्याकांडाची सीबीआय चौकशी करा:- राजेश निमावत

0
170

blank

गोंदिया:- राजस्थान येथील हर्षा वैष्णव हत्याकांडाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वैष्णव बैरागी समाजाच्या शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने जिल्हाधिकारी गोंदिया यांना दिलेल्य  निवेदनात केली आहे. या संदर्भातील सविस्तर माहीती अशी की, राजस्थान येथील जोधपूर जिल्ह्यातील लोहावट या गावातील नाबालिक युवती सोबत दुष्कृत्य करून  तिची हत्या करण्यात आली. यासंदर्भात दोषींची सीबीआय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या नावाने दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.सदर निवेदन जिल्हाधिकारी गोंदिया यांना वैष्णव बैरागी समाजातर्फे देण्यात आले. सदर घटना 21 सप्टेबंर रोजी दुष्कृत्य करणाऱ्या आरोपींनी 16 वर्षीय कुमारी हर्षा वैष्णवला अमानवीय पद्धतीने कापून रेल्वे ट्रॅकवर फेकून दिले होते. वैष्णव बैरागी समाजाच्या शिष्टमंडळाद्वारे उपरोक्त घटनेच्या संदर्भातील सीबीआय तपास करण्याची मागणी तसेच आरोपींना कठीणातील कठीण शिक्षा झाली पाहिजे याची मागणी सदर निवेदनातून करण्यात आली आहे. सदर शिष्टमंडळात वैष्णव बैरागी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेश निमावत,सचिव भगवानदास वैष्णव, उपाध्यक्ष सुरेश वैष्णव, कोषाध्यक्ष रुपेश वैष्णव, ज्येष्ठ मार्गदर्शक नारायणदास निमावत, पोषणदास निमावत, रामचरण निमावत, मुरारी निंबार्क, देवेंद्र निंबार्क, महिला संघटनेचे अध्यक्ष प्रीती वैष्णव,पुनम वैष्णव, अनुराधा निमावत, रंजना निमावत, प्रीती निमावत व आरती वैष्णव यांचा समावेश आहे.

blank