34.4 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ भंडारा जिल्ह्यात आज 91 कोरोना पॉझिटिव्ह,127 रुग्णांना डिस्चार्ज

भंडारा जिल्ह्यात आज 91 कोरोना पॉझिटिव्ह,127 रुग्णांना डिस्चार्ज

0
127

blank

भंडारा दि. 15 : जिल्ह्यात आज 127 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 5703 झाली असून आज 91 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 7192 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.30 टक्के आहे.

            आज 891 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 91 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 57 हजार 402 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 7192 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 29, साकोली 03, लाखांदूर 03, तुमसर 05, मोहाडी 04, पवनी 31 व लाखनी तालुक्यातील 16 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 5703 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 7192 झाली असून 1310 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 02 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 179 झाली आहे.

    रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 79.30 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.48 टक्के एवढा आहे.

नागरीकांना आवाहन

  • कोवीडपासून बचावासाठी मास्क हा आपला मुख्य संरक्षक आहे, मास्कचा सदैव आणि योग्य वापर करा.
  • साबण आणि पाण्याने हात वारंवार कमीत-कमी 20 सेकंद व्यवस्थित धुवा.
  • साबण आणि पाण्याची सुविधा उपलब्ध नसेल तर अल्कोहोलयुक्त हॅंड सॅनिटायझरचा वापर करा.

blank