35.8 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home शैक्षणिक नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेतील तांत्रिक अडचणी सोडवा-संदिप रहागंडाले

नागपूर विद्यापीठाच्या परिक्षेतील तांत्रिक अडचणी सोडवा-संदिप रहागंडाले

0
183

blank

गोंदिया,दि.16ः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्यावतीने 8 आँक्टोंबरपासून सुरु करण्यात आलेल्या आँनलाईन परिक्षेमध्ये मोठ्याप्रमाणात तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने आणि परिक्षेसंबधीची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोचत नसल्यासंदर्भातले पत्र  भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा उपाध्यक्ष संदीप रहांगडाले यानी कुलगुरु सुभाष चौधरी यांना पाठवत कारवाईची मागणी केली आहे.
पत्रात 8 ओक्टोबर 2020 पासून सुरु झाली असून ऑनलाइन परीक्षे दरम्यान तांत्रिक अडचण येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास होत आहे. वेळेवर OTP जनरेट होत नाही, सबमिटचा ऑप्शन येत नाही. तसेच अनेक कारणामुळे विद्यार्थी संमभ्रमात पडले असून त्यांनी काय कराव? त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याकरीता कुणाकड़ेही योग्य माहिती नसल्याने विद्यापीठाने याकडे लक्ष द्यावे असे म्हटले आहे.

blank