भडंगा येथे निरोप समारंभ
गोरेगाव : तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, भडंगा येथील उच्च श्रेणी मुख्याध्यापिका रेखा पुरणलाल पटले ह्या ३१ मे रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाल्या. त्यानिमित्त भडंगा येथे त्यांचा सेवानिवृत्ती निरोप समारंभ उत्साहात पार पडला. सन १९८८ पासून सलग ३८ वर्षे त्यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाचा गौरव या वेळी करण्यात आला.
रेखा पटले यांनी सन १९८८ मध्ये भंडारा जिल्हा परिषदेच्या मोहाडी पंचायत समिती अंतर्गत ‘ऊसर्रा’ या गावी सहाय्यक शिक्षिका म्हणून आपल्या सेवेला सुरुवात केली. त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये त्यांनी सहाय्यक शिक्षक, पदवीधर शिक्षक ते उच्च श्रेणी मुख्याध्यापक पदापर्यंत त्यांनी प्रत्येक जबाबदारी समर्थपणे सांभाळली. निरोप समारंभादरम्यान उपस्थितांनी रेखा पटले यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘त्यांचे कार्य आणि व्यक्तिमत्त्व सर्वगुणसंपन्न आहे. त्यांच्याविषयी बोलताना शब्द अपुरे पडतात. त्यांच्या निवृत्तीने शिक्षण क्षेत्रातील एक मार्गदर्शक ऊर्जास्थान आज सेवानिवृत्त झाल्या. समारंभाच्या शेवटी भडंगा शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद, ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी रेखा पटले व त्यांच्या परिवाराचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञतापूर्वक सत्कार करण्यात आला.





