
लाखनी,दि.16ः-द लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 2020 च्या पूर्व प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. एकूण 22 विद्यार्थी या परीक्षेमध्ये पास झालेले असून अतिशय चांगला निकाल लागलेला आहे आणि यासह उत्कृष्ठ निकालाची परंपरा शाळेने यावर्षीदेखील जोपासलेली आहे. इयत्ता पाचव्या वर्गातील ऋतुजा बुरडे, चिरायु कमाने, आर्या चोपकर, वैष्णवी कावळे, रुद्र लिल्हारे, गिरीश माटे, आयुष करवाडे, वेदिका वंजारी, आर्यन काळे, दर्शन मुटकुरे, आयुषी हुमने, भावेश वाघाये हे 12 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत तर इयत्ता 8 व्या वर्गातील आयुष निखाडे, निवेदिता डहाट, विनीत लेकुरवाळे, विक्रांत शहारे, समिग्रा वनवे, सुचेत आठवले, गायत्री हत्तीमारे, श्रद्धा सार्वे, तोमेश्वरी पाखमोडे, सुहानी सिंगनजुडे हे दहा विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे सचिव संजय वनवे, प्राचार्या आशा वनवे, शिक्षक प्रशांत वाघाये, आशिष बडगे, अंजली कानतोडे, याह्या आकबानी, शिल्पा कांबळे, प्रांजली मानकर, प्रतीक्षा बंसोड, प्रिया ठाकरे, मिनाक्षी डोरले तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.





