
सडक अर्जुनी= तालुक्यातील कोसमतोंडी येथे १७ आक्टोंबरला माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे आमदार स्थानिक विकास निधीतून बांधण्यात आलेल्या शारदा माता सभामंडपाचे लोकार्पण माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री मा. राजकुमार बडोले यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी सडक अर्जुनी पं.स.चे माजी सभापती गिरीधारी हत्तीमारे, माजी उपसभापती राजेश कठाणे, भाजप आदिवासी प्रदेश सदस्य लक्ष्मीकांत धनगाये, डॉ.बोधनकर , डॉ.विश्वनाथ राहांगडाले,मनोहर काशिवार,शिशीर येळे,युवा मोर्चा अध्यक्ष विलास बागडकर, अनिल गजभिये,गौरेश बावनकर, किशोर मळकाम, मनोहर निर्वाण,अशोक पटले,संजय काशिनाथ, शारदा मंडळाचे अध्यक्ष शांमकुवर कवरे व शारदा मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शारदा माता सभामंडपाचे लोकार्पण प्रसंगी बोलताना माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले की,मागिल दहा वर्षांत अर्जुनी मोरगाव मतदार संघात विविध विकास कामे केली.लोकांची कामे करत असताना नेहमी सर्वांचे सहकार्य लाभले.मागिल काळात राहिलेले प्रस्तावित कामे मार्गी लावण्यास प्राधान्य देणार असल्याचे यावेळी सांगितले.