18लाखांचा पुरस्कार असलेले पाच नक्षली ठार,साहित्य जप्त,ओळख पटली

0
220

गडचिरोली,दि. 20:-उपविभाग धानोरा अंतर्गत येणार्‍या पोलिस मदत केंद्र ग्यारापत्ती हद्दीतील किसनेली जंगल परिसरात १७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता सी-६0 जवान व नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले होते. यात एक पुरुषाचा व चार महिलांचा समावेश आहे. या पाच मृत नक्षल्यांची ओळख पटली आहे.
समीता उर्फ राजो किरको (३४) रा. मंगनेर ता. धानोरा, कुमली चिपळुराम गावडे (२३) रा. कटेझरी ता. धानोरा, सुमन उर्फ झुनकी उर्फ सुलकी बुच्चा पदा (३२) रा. पिपली बुर्गी, ता. एटापल्ली. चंदा उर्फ चंदना उर्फ मासे भालसे/भाकसे (२५) रा. बुडगीन ता. जेगरगुन्डा जि. बजापूर, टिरा उर्फ नीलेश उर्फ शिवाजी दारसू मडावी (३0) रा. चिचोडा ता. धानोरा असे चकमकीत ठार झालेल्या नक्षल्यांची नावे आहेत. समीता उर्फ किरको ही सन २0११-१२ मध्ये प्लाटून क्र. २0 मध्ये भरती होऊन २0१३-१४ ते आजपर्यंत ती प्लाटून क्र. १५ चे सदस्य पदावर कार्यरत होते. तिचेवर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलिस स्टेशनमध्ये २ खून, ९ चकमक व ३ असे एकूण १४ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. कुमली चिपळूरा गावडे ही कोरची दलम सदस्य होती. २0१६ मध्ये भरती होऊन ती सघ्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यामध्ये २ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सुमन उर्फ झुनकी बुच्च्दा पदा ही टिपागड दलम एसीएम सदस्य म्हणून सन २00६-0७ मध्ये भरती होऊन २0१९ ते आजपर्यंत टिपागड एलओएसमध्ये एसीएम सदस्या पदावर कार्यरत होती. तिच्यावर १ खून, १४ चकमक व इतर ६ असे २१ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. चंदा उर्फ चंदना भालसे/भाकसे ही प्लॉटून क्र. १५ ची सदस्य असून ती सन २0१८ मध्ये भरती होऊन आजपर्यंत प्लॉटून क्र.१५ ची सदस्य म्हणून कार्यरत होती. टिरा उर्फ नीलेश मडावी हा टिपागड बदल सदस्य असून तो २0१५ मध्ये भरती होऊन २0१९ ते आजपर्यंत तो टिपागड दलम सदस्य पदावर कार्यरत होता. त्याच्यावर ६ खून, ७ चकमक व ७ असे एकूण २0 गंभीर गुन्हे विविध पोलिस ठाण्यात दाखल आहेत.