जिल्ह्यात दाट धुक्याची चादर

0
783

गोंदिया,दि.20ः- गोंदिया जिल्ह्यात आज पहाटेपासूनच सर्वत्र धुक्याची दाट चादर पसरल्याने दिवस उजाडल्यानंतरही काही अंतरावरील वाहनासंह व्यक्तीही स्पष्टपणे दिसत नसल्याने देवरीतील महामार्ग तसेच गोंदिया शहरातील बायपास मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला होता.पावसाळा संपून थंडीची सुरुवात झाल्याची ही लक्षणे आहेत.जिल्ह्यात परिसरात पावसाचा मागमूसही लागला नाही. सध्या मात्र हवामानात बदल होऊन थंडी पडायला सुरुवात झाली आहे. दिवसा हवामानात ऊष्मा जाणवत असली तरी सायंकाळनंतर शहरातील वातावरणात गारवा येऊ लागला आहे.

आज पहाटेपासून सर्वत्र धुके पसरल्याने काही मिटर अंतरावरील देखिल स्पष्ट दिसत नाही. वाहनचालक गाडीच्या लाईट तसेच इंडिकेटर दिवे लावून वाहने चालवत होते. पहाटे पायी(मॉर्निगं वॉक) चालण्याकरिता जाणार्‍यांकरिता धुक्याची ही चादर वेगळीच पर्वणी ठरली होती . धुकं ऐवढ दाट होते की सकाळी सात वाजे पर्यंतही सुर्यनारायणाचे दर्शन देखिल झालेले नव्हते.