गडचिरोली,दि.21*: आज कोरोनामुळे 2 मृत्यूंसह जिल्हयात 105 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 67 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 4865 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 3984 वर पोहचली. तसेच सद्या 840 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 41 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन 2 मृत्यू मध्ये गडचिरोली येथील 66 वर्षीय उच्च रक्तदाब पीडीत महिला व मुरुमगाव धानोरा येथील 46 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 81.89 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 17.27 तर मृत्यू दर 0.84 टक्के झाला.
नवीन 105 बाधितांमध्ये गडचिरोली 43, अहेरी 1, आरमोरी 13, भामरागड 3, चामोर्शी 6, धानोरा 10, एटापल्ली 5, कोरची 8, कुरखेडा 6, मुलचेरा 4, सिरोंचा 1 व वडसा येथील 5 जणांचा समावेश आहे.
आज कोरोनामुक्त झालेल्या 67 रूग्णांमध्ये गडचिरोली 41, अहेरी 1, आरमोरी 11, भामरागड 0, चामोर्शी 2, धानोरा 4, एटापल्ली 4, मुलचेरा 0, सिरोंचा 2, कोरची 0 व कुरखेडा मधील 2 जणांचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील 43, यामध्ये रामपुरी वार्ड येथील 5, अयोध्यानगर 2, गोकुळनगर 3, कोर्ट कॉलनी 1, रामनगर 2, स्थानिक 1, सोनापुर कॉम्प्लेक्स 1, एस.पी कार्यालय 1, कोटगल 1, साईनगर नवेगाव 3, सर्वोदय नगर 1, महिला महाविद्यालयाजवळ 1, पोटेगाव 1, वनश्री कॉलनी 1, बसेरा कॉलनी 1, रेड्डी गोडाऊन चौक 1, कॅम्प एरिया 1, कन्नमवार वार्ड 1, चामोर्शी रोड 3, मेडिकल कॉलनी 1, कोटगल हेटी 1, शाहुनगर 1, पंचवटीनगर 1, विठ्ठल मंदिराजवळ सर्वोदय वार्ड 1, ग्रामसेवक कॉलोनी 1, एसआरपीएफ जवान येथील 2 आयटीआय कॉलोनी मागे डॉ. मलिक हॉस्पिटल जवळ 1 जणाचा समावेश आहे. अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 12 जणांचा समावेश आहे. भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 2 जणाचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी येथील 4 (त्यापैंकी 3 पोलीस), वागधरा 1, स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, सीआरपीएफ जवान 2, पोलीस स्टेशनमधील 1, मेंढाटोला 1, सीआरपीएफ 1, चातगांव येथील 4 जणाचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, जांभिया येथील 1, चंदनवेली 1, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 8, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये कढोली येथील 2, सोनसरी येथील 2, गोठणगाव 1, स्थानिक 1 जणाचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये विवेकनंदपुर 2, खुदीरामपल्ली 1, सुंदरनगर 1 जणाचा समावेश आहे. सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1 आहे व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कन्नमवार वार्ड येथील 2, सीआरपीएफ जवान 1, सिंदी कॉलोनी येथील 2 जणाचा समावेश आहे. इतर जिल्ह्यातील 2 जणांचाही समावेश आहे.