गोंदिया,दि.२१::केंद्रीय मंत्रीमंडळाने १ मे २०१७ पासून केंद्रीय मंत्र्यापासून राज्यातील मंत्री,अधिकाèयांच्या शासकीय वाहनावर असणारे (लाल,अंबर,निळा)दिवे हद्दपार केले.त्याची अमलंबजावणीही सुरु झाली.त्या निर्णयाला सर्वच राज्यानी अमलांत आणले असले तरी महाराष्ट्रातील काही अधिकारी त्या नियमांला तिलाजंली देत आपल्या वाहनावर आजही दिवे लावून फिरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.कुठल्याही जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारीच नव्हे तर सचिवस्तरावरील अधिकारी असो की कुणीही यांना आपल्या वाहनावर दिवा लावता येणार नसल्यासंदर्भातला भारत सरकारचा राजपत्रच निघालेला असताना या राजपत्राला ठेंगा दाखवत गोंदियाचे विद्यमान जिल्हाधिकारी यांनी(तत्कालीन नव्हे) तसेच जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आपल्या वाहनावर दिवा लावून त्या राजपत्राचीच अवहेलना केल्यासंदर्भातील वृत्त
सरकारच्या राजपत्राला अधिकार्यांचा ठेंगा,दिव्याचा मोह सुटेना या मथळ्याखाली आज २१ ऑक्टोंबरला बेरार टाईम्सने प्रकाशित केले होते़. य़ा प्रकाशित वृत्ताची दखल घेत जिल्हा परिषदेच्या सीईओंनी आपल्या वाहनावर लावलेला अंबर दिवा अखेर आज बुधवारला हटविला.मात्र दुसरीकडे जिल्हाधिकारी यांनी शासन नियमाला वेशीवर टांगण्याच्या आपल्या भुमिकेला कायम ठेवल्याचे दिसून येत आहे.