29.8 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण, उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

0
201

blank

मुंबई,दि.26ः राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल झालो आहे, अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे. पवारांना उपचारासाठी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेससह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन’, असेही अजित पवार म्हणाले.

काही दिवसांपूर्वी अजित पवार यांना कोरोनाची लक्षणे जाणवू लागली होती. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी 22 ऑक्टोबरपासून क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला होता. तसेच त्यांची तातडीने कोरोनाची चाचणीही करण्यात आली होती. मात्र, त्यावेळी त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला होता. पण, आज अजित पवारांना आज सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.