खेमेंद्र कटरे/गोंदिया,दि.29ः ग्रामीण भागातील कुटुंबांना सन २०२४ पयंत “हर घर नल से जल” हे पाणी पुरवठ्याचे उदिष्ट्ट साध्य करण्याकरिता राज्यात जल जीवन मिशन राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या शासन निर्णयानुसार जल जीवन मिशनच्या अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनवर सोपवण्यात आली आहे.जिल्ह्याती जल जीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेमधील कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाची भूमिका महत्वाची आहे.मात्र अनेक जिल्हा परिषदेत ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्याांची पदे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील कार्यकारी अभियंत्याांमधून प्रतिनियुक्तीने भरली जातात.मात्र सध्याच्या घडीला राज्यातील 13 जिल्हा परिषदामधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पद रिक्त असल्याने त्या पदाचा प्रभार जिल्हा परिषदेतील इतर कार्यकारी अभियंता किंवा उपअभियंत्याकडे सोपवला जात असायचा.मात्र आता शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या 28 आँक्टोंबरच्या आदेशानुसार महाराष्ट्र जिवन प्राधिकरण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे या रिक्त पदाचा प्रभार तत्काळ प्रभावाने सोपविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना यासंदर्भात सुचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.त्यानुसार विदर्भातील अमरावती,नागपूर,गोंदिया,चंद्रपूर या 4 जिल्हा परिषदामधील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचा कार्यकारी अभिंत्याचा पदभार आजपासून महाराष्ट्र जिवन प्राधिकरणाकडे सोपविला जाणार आहे.
अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलेले जिल्हे
पुणे विभाग
१) सांगली- श्री.व्ही.एल. कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, सांगली.
२ )कोल्हापूर श्री.डी.के . महाजन,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, कोल्हापूर.
३) सोलापूर श्री.पी.सी. भांडेकर,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग
नाशिक विभाग
४)नाशिक श्री.एस.बी.नरवाडे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,
जल व्यवस्थापन विभाग, नाशिक.
५ )जळगाव श्री.एस.सी. निकम,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, जळगाव.
६) अहमदनगर श्री.एम.जी. सराफ,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, अहमदनगर.
औरगांबाद विभाग
७) औरगांबाद अजय जे.सिंह,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, औरांगाबाद.
८) नांदेड श्री.व्ही.एल. कुलकर्णी,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, नांदेड.
९) लातूर श्री.एस.व्ही. कायांदे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, लातूर.
अमरावती विभाग
१०) अमरावती श्री.वि.भा. सोळंके ,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, अमरावती.
नागपूर विभाग
११) नागपूर श्रीम.के .एस. भोळे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग, मुख्य अभियंता
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे कायालय, नागपूर.
१२) गोंदिया आर.पी. चंद्रिकापुरे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग गोंदिया.
१३) चंद्रपूर श्री.के .आर. घोडमारे,
कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग,चंद्रपूर