रेतीची व मुरूम चोरी करणारा ट्रॅक्टर व टिप्पर जप्त

तलाठी गस्ती पथकाची कारवाई

0
286

अर्जुनी-मोर,दि.29 ऑक्टोंबर:-अर्जुनी मोर तालुक्यात गौण खनिज रेती चोरी करणार्‍या विरुद्ध कारवाई करत तलाठी गस्ती पथकाने आज(दि.29) पहाटे पाच वाजता एक रेतीचा बिना परवाना टिप्पर पकडून अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालयात जमा करण्यात आला. तसेच बिना परवाना मुरूम चोरी करतांना एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालयात मध्ये जमा करण्यात आला. महसूल विभागाचे मंडल अधिकारी एम .के. मेश्राम, तलाठी साखरे, तलाठी जांभुळकर, तलाठी कापगते, तलाठी ताकसांडे यांनी बजावली आहे.
अवैधरित्या रेतीची वाहतूक करीत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असताना, आज दि.29ऑक्टोंबर रोज गुरूवारला अरुननगर येथे सचिन बाळू गुरनुले राहणार लाखांदूर यांच्या मालकीचा टिप्पर क्रमांक एमएच 40,बीएल5826,चालक,मालक सचिन बाळू गुरनुले राहणार लाखांदूर हा चालक मालक अवैधरीत्या विनापरवाना पाच ब्रास रेतीची वाहतूक करताना अरुननगर येथे पहाटे 4.10 वाजता आढळला.मंडळ अधीकारी एम.के.मेश्राम, तलाठीव्हि. पी.साखरे,एम.जी.जांभूळकर यांच्या गस्ती पथकाने पंचनामा करून ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जप्त केला आहे. तर दुसरी कारवाई कुंभिटोला येथे लोकेश पुरणलाल घरतकर हा चालक गंगाधर कारू देशमुख राहणार बाराभाटी यांच्या मालकीचा ट्रॅकटर क्रमांक एमएच 35,एजी 4945 ट्राली क्रमांक एमएच 33,एफ 4866 परवाना नसतांना 1ब्रास मुरूमची अवैध वाहतूक करतांना आढळून आला.ही कारवाई आज दि.29 रोजी रात्री 1.30 वाजता करण्यात आली.त्या दोघांवरही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 अन्वये ट्रॅक्टर चालक व मालकावर कारवाई करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुका व भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर व साकोली या शेजारच्या तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर रेतीची अवैध वाहतूक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर होत आहे. अशी माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील महालगाव,सुकळी,परसोडी, पळसगाव,तई घाटावरून रेतीची अवैध तस्करी नवेगावबांध व तालुक्यात होत असल्याची माहिती आहे. महालगाव पळसगाव, गोंडउमरी येथील व अन्य ठिकाणचे तसेच काही स्थानिक रेती तस्कर रेती अवैध वाहतुकीचा गोरखधंदा बऱ्याच दिवसापासून करीत असल्याची माहिती आहे.
अर्जुनी मोरगाव तहसील कार्यालया अंतर्गत गौणखनिजांची अवैध वाहतूक व चोरी रोखण्यासाठी 27 तलाठी व मंडळ अधिकारी यांचे पथक तहसीलदार अर्जुनी मोरगाव विनोद मेश्राम यांनी नियुक्त केले आहेत. तालुक्यात होणाऱ्या अवैध रेती सारख्या गौण खनिजांची चोरी करणाऱ्या तस्करांवर हे पथक नजर ठेवून आहेत. त्यामुळे या महसूल विभागाच्या दणक्यामुळे आता रेती चोरणाऱ्यांची खैर नाही. तालुका अर्जुनी मोरगाव येथे अवैध रेती वाहतूक करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती अर्जुनी मोरगावचे तहसीलदार विनोद मेश्राम यांनी दिली आहे.