अंभोराजवळ अपघात,मोटारसायकलस्वार ठार

0
754

चिचगड,दि.01-ः चिचगड पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या अंभोरा गावाजवळ ट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जखमी होऊन उपचारासाठी चिचगड रुग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.ही घटना शनिवारला सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडली.मृतकाचे नाव नारायण बोडकू बडोले(रा.अंभोरा)असे आहे.ट्रकचालकाने धडक दिल्यानंतर फरार होण्याचा प्रयत्न केला.मात्र पोलिसांना घटनेची माहिती होताच चिचगडचे ठाणेदार अतुल तवाडे यांनी पाठलाग करुन ट्रक क्रमांक सीजी 08 एए 5851 ला बोंडेजवळ ताब्यात घेतले.यावेळी पोलीस कर्मचारी सुधाकर शहारे,विष्णू राठोड व रवी जाधव हे तपास कामी उपस्थित होते.