39.9 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home विदर्भ गडचिरोली एका मृत्यूसह 62 नवीन कोरोना बाधित, तर 106 जण कोरोनामुक्त

गडचिरोली एका मृत्यूसह 62 नवीन कोरोना बाधित, तर 106 जण कोरोनामुक्त

0
116

blank

गडचिरोली,दि.02: कोरोनामुळे एका मृत्यूसह जिल्हयात 62 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 106 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 6016 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 5098 वर पोहचली. तसेच सद्या 858 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 60 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन एका मृत्यूमध्ये आरमोरी येथील 52 वर्षीय पुरुष समावेश आहे. आज जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.74 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 14.26 टक्के तर मृत्यू दर 1.00 टक्के झाला.

नवीन 62 बाधितांमध्ये गडचिरोली 24, अहेरी 5, आरमोरी 4, भामरागड 18, चामोर्शी 3, धानोरा 0, एटापल्ली 3, कोरची 1, कुरखेडा 3, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 1 जणाचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 106 रूग्णांमध्ये गडचिरोली 56, अहेरी 7, आरमोरी 2, भामरागड 7, चामोर्शी 9, धानोरा 1, एटापल्ली 5, मुलचेरा 5, सिरोंचा 1, कोरची 1, कुरखेडा 3 व वडसा मधील 9 जणांचा समावेश आहे.

नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये सोनापुर कॉम्पलेक्स 1, साईनगर 2, , गोंडवाना युनिर्व्हसिटी जवळ एमआयडीसी रोड 1, कारमेर शाळेजवळ 1, कॅम्प एरिया 2, टेंभा येथील 2, सुयोग नगर 1, आनंद नगर सेमाना रोड 1, गोकुलनगर 2, स्नेहानगर 1, स्थानिक 2, डब्युुर एच 1, बाजार रोड हनुमान मंदिर 1, आंबेडकर चौक येवली 1, फुले पुतळयाजवळ वार्ड नं.2, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, वांगेपल्ली 2, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, राम मंदिराजवळ 1, , सदगुरु नगर 1, हनुमान वार्ड 1, गोगांव 1, दुर्गा नगर 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये ताडगांव येथील 14, स्थानिक 4, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये आष्टी 2, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये हालेवारा (एलपीसी) येथील 3, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये दादापुर येथील 1, चिपरी 1, गोठणगांव 1, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये कालीमाता मंदिराजवळ 1, तसेच इतर तालुक्यातील बाधितामध्ये 1 जणांचा समावेश आहे.

blank