42.5 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home गुन्हेवार्ता बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राजला विनयभंगाच्या गुन्ह्यात अटक

0
1014

blank

गोंदिया,दि.03ः— बॉलिवूडचा हास्यअभिनेता विजय राज याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका युवतीने विजय राज याच्या विरोधात गोंदिया रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.शेरनी चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला पोलिसांनी अटक करीता जिल्हा न्यायालयात हजर केले.

अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.

शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे. आज दुपारी २ वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. याप्रकरणाविषयी पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात येत आहे. हॉटेल गेटवे प्रशासनाकडूनही सारवासारव करण्यात येत

blank