मुंबई, दि. ६ : सध्या आपण सर्वच कोविड -१९ या विषाणूमुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी सामना करीत आहोत. दीपावलीतही आपण सर्वांनी मास्क वापरणे, साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आणि दोन व्यक्तीत सुरक्षित अंतर ठेवणे याबाबींचे पालन करणे आवश्यक आहे. कोविड -१९ ला हद्दपार करण्यासाठी फटाके न वाजवता आपण प्रदूषणमुक्त दीपावली साजरी करुया. कोविड-१९ विषाणूचा हल्ला हा माणसाच्या फुफ्फसांवर होत असतो. त्यामुळे हवेची गुणवत्ता ढासळणार नाही याची काळजी आपण सर्वांनीच घेणे आवश्यक आहे. ”चला आपण संकल्प करुया प्रदूषण मुक्त दीपावलीचा, ध्यास घेऊया कोविड मुक्त महाराष्ट्राचा” हा संदेश पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे.
दीपावली म्हणजे फटाक्यांची आति
दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून फटाक्यांच्या ध्वनीची पातळी मोजली जाते आणि ज्या फटाक्यांची ध्वनीपातळी विहीत मर्यादेपेक्षा जास्त असते. त्याबाबतची माहिती पेस्को (नागपूर) पेट्रोलियम आणि एक्सप्लोजिव्ह विभाग यांना कळविली जाते. दरवर्षी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील प्रमुख शहरातील 150 पेक्षा जास्त ठिकाणी दिपावली उत्सवात ध्वनीची पातळी मोजण्यात येते. मागील तीन वर्षात फटाके वाजविण्याचे प्रमाण कमी झाल्याने ध्वनीच्या पातळीत घट होत आहे.