सडक अर्जुनी,,दि:09′- तालुक्यातील अर्जुनी वन क्षेत्र अंतर्गत येणाèया बारमाही वन मजुरांना जून ते ऑक्टोबर महिन्यांपर्यंचा त्यांच्या कष्टाचा मोबदला मिळाला नसल्याने त्यांच्यावर आर्थिक विवंचनेला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. संबंधित वन विभागाने तत्काळ मजुरी अदा करावी, अन्यथा वनक्षेत्र अधिकारी कार्यालयापुढे आंदोलन करण्याचा इशारा वंचित मजुरांनी वनक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
सडक अर्जुनी वन क्षेत्र अंतर्गत अनेक बारमाही मजूर कार्यरत आहेत. या मजुरांना जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या पाच महिन्यांपासूनची मंजुरी देण्यात आलेली नाही. संबंधित अधिकाèयांकडे वारंवार मजुरांनी मजुरीची मागणी केली. परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून वेळ मारून नेण्यात येत आहे. डोंगरगाव आगार येथील वन मजुरांना ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीचे वेतन मिळालेले नाही. याशिवाय १ जुलै २०२० पासूनचा वाढीव राहणीमान भत्त्याची थकबाकीही देण्यात आलेली नाही. वन मजुरांना ओळखपत्रही देण्यात आलेले नाही. पाच महिन्यांपासून वन मजूरांना मजुरी मिळाली नसल्याने मजुरांसह कुटुंबीयांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागत आहे. अनेक मजुरांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे. करिता वन विभागाने तत्काळ बारमाही वन मजरांची मजुरी अदा करावी, अन्यथा या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा वन मजुरांनी वनक्षेत्र अधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनाच्या प्रती उपवनसंरक्षक गोंदिया, वनक्षेत्र अधिकारी डोंगरगाव आगार यांना अग्रेषित करण्यात आले आहे.