भंडारा दि. 13: फास्ट लाईफ व अनियंत्रित जीवनशैलीमुळे जगात मधूमेहाचा धोक वाढत असून मधूमेह असलेल्या व्यक्तींच्या क्रमावारीत भारत देश संपुर्ण जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भंडारा जिल्ह्याचा विचार केल्यास जिल्ह्यात 35 हजार 735 व्यक्ती मधूमेहग्रस्त आहेत. आता दिवाळीसण सुरू असुन ‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ या उक्तीपासुन थोडे दूरच राहल्यास मधूमेहाचा धोका टळू शकतो. 14 नोव्हेंबर हा जागतिक मधूमेह दिवस असून योगायोगाने याच दिवशी ‘गोडधोड’ फराळाचा दिवाळी सणही आला आहे. त्यामुळे सावधानता बाळगणे हाच उत्तम उपाय ठरणार आहे.
14 नोव्हेंबर या जागतिक मधूमेह दिनाची यावर्षीची थीम नर्स आणि मधूमेह ही असून आपला देश जागतीक क्रमावारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार 2030 मध्ये भारत मधूमेहिच्या संख्येत चिनला मागे टाकणार आहे.
शरीरात रक्तातील साखरेचे प्रमाण अतिरिक्त वाढणे यास मधुमेह म्हणता येईल. शरीरात अग्न्याशय (पॅन्क्रीयास) नावाची ग्रंथी असते. ती इंन्सुलीन नावाचे संप्रेरक (एन्झाईम) निर्माण करते. आपण शारीरिक उर्जा निर्माण होण्यासाठी जे काही ग्रहण करतो त्याचे रुपांतर शेवटी शर्करेत होते, हया शर्करेमुळेच शरीराचे पोषण होते परंतु काही शारीरिक अडचणीमुळे अग्न्याशय इंन्सुलीन स्त्रवण्याचे प्रमाण कमी होते किंवा बंद होते त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रीत होत नाही व रक्तातील शर्करा वाढते. यालाच मधूमेह म्हणतात.
भंडारा जिल्हयात असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत मधुमेह रुग्णांची तपासणी करण्यात येते, त्याअनुषंगाने खालील प्रमाणे तालुकानिहाय मधुमेह रुग्णांची माहिती आहे.
अ.क्र | तालुक्याचे नाव | मधुमेही रूग्णांची संख्या |
1 | भंडारा | 11345 |
2 | साकोली | 4691 |
3 | लाखनी | 4119 |
4 | मोहाडी | 1936 |
5 | तुमसर | 4551 |
6 | पवनी | 4550 |
7 | लाखांदूर | 4143 |
रक्त शर्करा वाढण्याचे काही मुख्य कारणे:- •शारीरिक कार्याचा अभाव किंवा व्यायाम न करणे •अयोग्य कारक आहार जसे अती तेलकट, गोड, मांस, जंक फुड व मिठाचे सेवन •जसे तंबाखू, खर्रा, दारुचे व्यसन असणे. अतिरिक्त वजन असणे •वाढत्या वयानुसार मधुमेह होण्याचा धोका असतो •आई वडिलांना मधुमेह असल्यास तो अनुवांशीकतेने होतो.
मधुमेहामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम:- •डायबेटीक Nuroathy •डोळयांचे आजार •किडणीचे आजार •हृदयाचे आजार •गॅग्रीन (जखम झालेल्या ठिकाणी जखम लवकर न भरुण येणे, जखम सडणे).
मधुमेह न होण्यासाठी किंवा झाल्यावर घ्यावयाची काळजी:- •प्रती दिन किमान 45 मिनीटे व्यायाम योगासन करणे •वेळेवर जेवण करणे, जेवणात हिरव्या पालेभाज्या, कडधान्य खाणे, तेलकट, तुपकट, सिल बंद, पदार्थ, मांसाहार टाळणे •फळे मोठयाप्रमाणात खाणे, मिठाचे सेवन कमी करणे •अतिरिक्त वजन वाढू देवू नये •तंबाखू, खर्रा, तंबाखूजन्य पदार्थ, दारुचे व्यसन न करणे •आई वडिलांना मधुमेह असल्यास, अधिक काळजी घेणे.
मानसाच्या शरीरात रक्त शर्करा योग्य असण्याचे प्रमाण साधारण 140 पेक्षा कमी असायला हवे. जसे उपाशी पोटी:- 126 पेक्षा कमी व जेवणानंतर:- 200 पेक्षा कमी असायला हवे. जागतिक मधूमेह दिनानिमित संतुलीत आहार, नियमित व्यायाम व नियंत्रित जीवण शैलीचा अंगीकार करून मधूमेह या आजाराला दूर ठेवण्याचा प्रण करूया.