अर्जुनी मोरगाव,दि.13ः:-पैशाअभावी दिवाळी सारखा महत्वाचा सण कित्येक कुटुंबाना साजरा करता येत नाही परिणामी याची जाणीव ठेवून पोलीस विभागाने जीवनोपयोगी वस्तू भेट देण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे,जनतेची सेवा हीच आमची दिवाळी होय असे प्रतिपादन नवेगाव /बांधचे ठाणेदार बाबासाहेब बोरसे यांनी केले.
अर्जुनीमोर तालुक्यातील आदिवासी गाव येरंडी/दर्रे येथे या कार्य क्रमाचे आयोजन करण्यात आले.अध्यक्षस्थानी सरपंच मनिषाताई शहारे या होत्या. मंचावर उपनिरीक्षक विनोद भूरले, उपसरपंच सोनियाताई वाढई, ग्रामसेवक पृथ्वीराज कोल्हटकर उपस्थित होते. श्री बोरसे पुढे बोलताना म्हणाले कि जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतुन यंदाची दिवाळी “आदिवासी बांधवानसोबत” हा कार्यक्रम करण्यात आला असे ते म्हणाले.
श्रीमती वाढई यांनी या कार्यक्रमाचे कौतुक करून म्हणाल्या कि असे कार्यक्रम सामाजिक आणि धार्मिक सलोखा निर्माण करतात. हे गाव कोव्हीड 19 मुक्त गाव आहे असे त्या म्हणाल्या. या प्रसंगी बोलताना श्री कोल्हटकर यांनी भारतीय राज्यघटनेच्या कलम 340, 341 आणि 342 मुळे आमचे जीवन सार्थक झाले आहे. महापुरुषांची विचारधारा आत्मसात करून आदिवासी बांधवाणी आपला सर्वांगिन विकास साधावे असे सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संपूर्ण 130 कुटुंबाना मिठाई, साडी, पादत्राने, खेळणी, टी शर्ट चे वितरण करण्यात आले.प्रास्ताविक पवनी/ धाबे चे उपनिरीक्षक श्री भूरले यांनी, संचालन पोलीस पाटील श्री कोडापे यांनी तर आभार मुख्याध्यापक श्री फरदे यांनी मानले. यावेळी पोलीस आणि मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
जनतेची सेवा हीच पोलिसांची दिवाळी “- पोलीस निरीक्षक बोरसे यांचे प्रतिपादन
(मिठाई आणि जीवनोपयोगी भेंट वस्तूचे वितरण थाटात )