
-
मंदिर समितीने आरोग्याची काळजी घेत दर्शन व्यव्यस्था चांगली ठेवली.आणि देवाच्या विठुरायाच्या दर्शनाने एक सात्विक उर्जा प्राप्त झाल्याचे रामेश्वर राव या भाविकाने भावना व्यक्त केल्या.
राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी आज झाली. १७ मार्च रोजी श्री विठ्ठल मंदिर करोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्या नंतर माघी,चैत्री आणि आषाढी वारी भाविकाविना साजरी करण्यात आली.तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.vitthalrukminimandir.org या संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळवरून दर्शनाची वेळ घेतली आहे.