रात्रभर जागुन गावकय्रांनी पकडलेल्या कुख्यात गुंडांना पोलीसांनी सोडले!

कोरची पोलीसांचा अजब खाक्या : त्या गुंडांशी पोलीसांसोबत साटेलोटे

0
715

कोरची  )::अतिदुर्गम,आदिवासीबहुल व नक्षलग्रस्त तालुक्यातील कोरची पोलीस स्टेशन हद्दीतील बेतकाठी येथील गावकय्रांनी अख्खी रात्र जागुन दोन कुख्यात गुंडांना पकडुन किरायाने गाडी करुन पोलीस स्टेशन मध्ये आयते आणुन दिल्या नंतर देखिल पोलीसांनी गुन्हा दाखल न करताच परस्पर सोडुन दिल्याने पोलीसांच्या एकुणच कार्यप्रणालीवर शंका उपस्थीत केल्या जात असुन आयते पकडलेले कुख्यात गुंडांना मोकाट सोडल्याने गांवकरी मात्र चांगलेच धास्तावले आहेत.
कोरची तालुक्यातील बेतकाठी येथील गावकय्रांनी दिलेल्या माहिती नुसार किष्णा गुरुभेलीया या शेतकय्रांच्या घरी १३ नोव्हेंबर च्या मध्य रात्री शेळ्यांच्या गोठ्यातुन शेळ्यांचा आवाज आल्यानंतर उठुन पाहिले असता चार जण संशयीत इसम आढळले. त्यातील एक जवळ पास पंधरा हजार किंमतीचे भला मोठा बोकड उचलुन नेत असतांना अडविले असता या चार पैकी एकाने डोक्यावर काडीने जोरदार प्रहार केला मात्र सुदैवाने हुकले. त्यांनतर क्रिष्णा ने आरडाओरड केल्याने घरातील सदस्य व आजुबाजु चे गांवकरी जागे झाले . या चार पैकी दोन जण पळुन जाण्यात यशस्वी झाले पण दोन गुंडांना पकडुन ठेवण्यात यश आले.
या दोन गुंडांना पकडुन गावकय्रांनी अख्खी रात्र जागुन काढली. सकाळी गांवकरी व स्थानिक पोलीस पाटील यांनी गांव वर्गणी करुन किरायाने केलेल्या गाडीत टाकुन दहा किलो मिटर अंतरावरुन कोरची पोलीस स्टेशन मध्ये आयते आणुन दिले. या दोन्ही कुख्यात गुंडांवर गुन्हा दाखल करुन उरवरित दोघांचाही शोध घेऊन लवकरच जेरबंद करु असे सांगीतल्यानंतर गांवकरी बिनधास्तपणे आपल्या गांवी परतले.
मात्र, कोरची पोलीसांनी या पकडुन आणलेल्या कुख्यात गुंडांवर गुन्हा दाखल न करताच परस्पर सोडुन दिल्याची माहिती आज ता १६ ला बेतकाठी गावात मिळताच पोलीसच गुंडांना अभय देत असल्याने अख्खा गांव दहशतीत आलेला असुन दाद मागायची कुठे असा सवाल उपस्थीत केल्या जात आहे.