तुमसर=भंडारा-गोंदिया जिल्ह्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच संघटनात्मक कार्य जोमाने करून पक्षाला अधिक बळकट करावे, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.
येथे आयोजित काँग्रेस कार्यकर्ता व पदाधिकार्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष मोहन पंचभाई, सेवा दल अध्यक्ष कैलाश भगत, अनुसुचीत जातीचे अध्यक्ष सुरेश मेर्शाम, महासचिव गौरीशंकर मोटघरे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश पारधी, प्रमोद तितीरमारे तालुका अध्यक्ष शंकर राऊत, अशोक उके, निरीक्षक मार्कंड भांडारकर, तुमसर शहर अध्यक्षा अमरनाथ रगडे,तुमसर मोहाडी बूथ कमिटी अध्यक्षा गजानन झंझाड, मोहाडी तालुका अध्यक्ष राजेश हटवार,कान्हा बावनकर, प्रफुल्ल बिसेन,गवरेकर, अझर पासा, कृष्णकांत बघेले, बालकदास ठवकर,भवानी पारधी, नरेश ईर्श्वरकर, सीमा भुरे, करुणा धुर्वे, निरज गोर, विजय गिरीपुंजे, चूनिलाल ठवकर, सीमा बडवाईक, नूतन भोले, राजेश चोपकर, राकेश राऊत, निकीलेश गजभिये, आनंद सिंगनजुडे,शुभम गभाने ,शिव बोरकर,आदी उपस्थित होते
पटोले म्हणाले, भाजपाचे सरकार खोटारडे आहे. सामान्य जनता, शेतकरी, व्यापारी व युवकांचे सरकारद्वारे नवनवीन कायदे तयार करुन शोषण केले जात आहे. या खोटारड्या सरकारला धडा शिकविण्यासाठी गाव पातळीवरुन कार्यकर्त्यांनी समोर येणे गरजेचे आहे. जिल्ह्यात होवू घातलेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आजही सक्षम आहे. तो मोठा भाऊ आहे व यापुढेही मोठाच भाऊ राहील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान विविध पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकार्यांनी नाना पटोले यांच्या कार्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षात प्रवेश केला.