स्वच्छता हा आरोग्याचा महत्त्वपूर्ण घटक

* कोहलीटोला येथे जागतिक शौचालय दिन साजरा ,,, * परिसर स्वच्छतेसह शौचालय बांधकामाचे भूमिपूजन

0
354

सडक अर्जुनी – संपूर्ण जगाला कोविड-१९ या महामारीने विळखा घातला आहे. या महामारीचे मूळ अस्वच्छता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून स्वच्छता टिकवायची आहे. स्वच्छता हा आरोग्याचा महत्त्वपूर्ण घटक आहे, असे प्रतिपादन जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद गोंदियाचे शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद्र रहांगडाले यांनी केले.
आज 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळीटोला येथे आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच जीवनलाल लंजे तर प्रमुख अतिथी म्हणून विस्तार अधिकारी (आरोग्य) करंजेकर, आरोग्यसेवक एल. आर. कटरे, गटसमन्वयक राधेश्याम राऊत, समूह समन्वयक भूमेश्वर साखरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक मार्गदर्शन करताना सरपंच लंजे यांनी ‘शरीर धर्म खलग्रम साधनम्’ या उक्तीप्रमाणे ज्या ठिकाणी स्वच्छता असेल तर रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्यामुळे सर्व नागरिकांनी स्वच्छतेचा अंगीकार करावा असे सांगत सर्वांनी शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन केले. विस्तार अधिकारी आरोग्य श्री कारंजेकर यांनी पाणी व स्वच्छता संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. आरोग्यसेवक कटरे यांनी ही शौचालय वापरा संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार ग्रामसेविका पाझारे यांनी केले. त्यानंतर परिसर स्वच्छता करून वाढीव कुटुंबातील लाभार्थ्यांना भेटी पाच लाभार्थ्यांच्या शौचालय बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.