कॉमेडिअन भारतीसह पती हर्ष यांची ताब्यात घेऊन चौकशी,घरामध्ये सापडले ड्रग्स

0
169

मुंबई,दि.21ः प्रसिद्ध विनोदी कलाकार भारती सिंहच्या घरावर (NCB) अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने शनिवारी धाड टाकली आहे. भारती आणि तिच्या पतीवर अमली पदार्थांचे सेवन केल्याचे आरोप आहेत. NCB ने या दोघांना समन सुद्धा जारी केला. एका अमली पदार्थ तस्कराच्या चौकशीत या दोघांची नावे समोर आली होती. त्यानंतर भारतीच्या अंधेरी, लोखंडवाला आणि वर्सोवा येथील तिन्ही घरांवर रेड टाकण्यात आली. विशेष म्हणजे, या धाडीत NCB च्या टीमने अमली पदार्थ जप्त देखील केला आहे.

भारती आणि हर्षला ताब्यात घेऊन चौकशी

NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सांगितले, की टीमने भारती आणि हर्ष दोघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे. या दोघांच्या घरी कंझम्पशन क्वांटिटी अर्थात वापरण्यासाठी आणलेल्या प्रमाणात अमली पदार्थ सापडले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एका ड्रग पेडलरने या दोघांच्या घरी गांजा असल्याची माहिती दिली होती. त्यावरूनच भारतीच्या घरातून गांजा जप्त करण्यात आला आहे. यासंदर्भात दोघांनाही एनसीबीच्या प्रांतीय कार्यालयात उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.